शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

अनोखी कल्पना ; सायकल चालवता-चालवता पाय थकले की हँडलवरच्या पॅडलकडे सरसावतात हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 3:55 PM

हँडलवरच्या पॅडलने फारूख पार करतो रस्त्यावरचा अवघड चढ !

ठळक मुद्देटाकाऊ बनलेल्या अशा सायकलींना नवा लूक देण्याबरोबर त्यात आधुनिकता आणण्याचे अनेक प्रयोग म. फारुक मकबूलसाब सय्यद यांनी यशस्वी करून दाखवले आहेपायानं अन् हातानं पायडल मारून मोटरसायकलच्या बरोबरीने वेग साधणारे अन् व्यायामासाठीही स्पीडमीटर असलेली सायकलही बनवून सय्यदने आपल्यातली संशोधकता सिद्ध केली

रेवणसिद्ध जवळेकर

सोलापूर : एक कुटुंब एक दुचाकी, नव्हे तर कुटुंबातील एक सदस्य एक दुचाकी... या समीकरणाने सायकलचे गणितच पार बिघडून गेले. सायकल चालविताना होत असलेल्या व्यायामालाही या दुचाकीने (मोटरसायकलने) जणू ब्रेकच लावला आहे. टाकाऊ बनलेल्या अशा सायकलींना नवा लूक देण्याबरोबर त्यात आधुनिकता आणण्याचे अनेक प्रयोग म. फारुक मकबूलसाब सय्यद यांनी यशस्वी करून दाखवले आहे. पायानं अन् हातानं पायडल मारून मोटरसायकलच्या बरोबरीने वेग साधणारे अन् व्यायामासाठीही स्पीडमीटर असलेली सायकलही बनवून सय्यदने आपल्यातली संशोधकता सिद्ध केली आहे. 

पूर्वी श्रीमंतांच्या घरीच सायकल असायची. सर्वसामान्यांना सोडून द्या; मध्यमवर्गीयांनाही सायकल घेणे अशक्य होते. १९८०, ९० च्या दशकात महाविद्यालयीन युवक-युवतीही सायकलीवर जायचे. ज्यांच्याकडे सायकल त्यांची समाजात प्रतिष्ठा असायची. मित्रासमवेत फिरायला जाताना, शाळा-कॉलेजला जाताना डबलसीटचा आनंद... आता या केवळ आठवणी राहिल्या आहेत. सायकल चालविताना अनेक फायदे त्या वेळच्या युवकांना झाले. सायकल चालविणे म्हणजे एकप्रकारचा व्यायाम व्हायचा. आताची पिढी सायकलपासून दुरावली आहे. आपल्याला जे कष्ट झाले ते आपल्या मुलांना होऊ नये म्हणून पालकही मोठ्या हौशेने दुचाकी मोटरसायकली आणून देतात. 

डबल चेन... डबल स्पीड !- फारुकने आजपर्यंत एक हजार जुन्या सायकलींना नवा लूक दिला आहे. कोणी भंगारकडे सायकली देत असतील तर त्यांनी त्या सायकली इथे आणून दिल्या तर फारुक केवळ मजुरीवर त्या सायकलींना आधुनिकतेची जोड देत असतात.        दुकानांमध्ये केवळ सिंगल चेन असलेल्या सायकली विकत मिळतात. इथे मात्र डबल चेनच्या सायकली बनवून मिळतात. डबल चेन... डबल स्पीड सायकलीही फारुक सय्यदकडे पाहावयास मिळतात. 

१०० ऐवजी ५० पॅडल- शासकीय तंत्रनिकेतनमधील सागर पांचाळ, राम रसिदार, शोएब शेख, गणेश शेरखाने आणि विवेक साळुंके या पाच विद्यार्थ्यांनी एक प्रकल्प हाती घेतला आहे. पायाबरोबर हाताने पायडल मारण्याच्या सायकली अमेरिकेत पाहावयास मिळतात, तशीच एक सायकल संशोधन प्रकल्पात सादर करण्याचे ठरवले. या पाचही जणांनी एक जुनी सायकल आणून दिली. फारुकने ती सायकल आपल्या कल्पकतेने बनवली.  चढ चढत असताना एखाद्या सायकलला १०० पायडल मारावे लागतात. मात्र फारुकने बनविलेल्या पाय अन् हाताने पायडल मारता येणाºया या सायकलला केवळ ५० पायडल मारावे लागतात. 

आणून देताना जुनी... घेताना आधुनिक सायकल !- घरासमोर अडगळीत पडलेली सायकल भंगारवाल्यांना देऊन शे-दोनशे रुपये घेऊन आपण मोकळे होतो. शे-दोनशे रुपये मिळाल्याचा जो आनंद होतो त्यापेक्षाही अधिक आनंद होतो तो सय्यद यांच्याकडे जुनी सायकल नवीन करून घेण्यामध्ये. कंपन्यांमध्येही तयार होत नाहीत तशा आधुनिक सायकली बनविण्याचे तंत्र म. फारुक सय्यद यांनी आत्मसात केले आहे. 

भंगाराकडे जाणाºया सायकली अगदी कमी किंमतीत विकत घेतल्या जातात. त्याच सायकलींना आधुनिकतेचे रुप देण्याचे काम करीत असतो. आजपर्यंत मी २ हजारांहून अधिक सायकलींना नवा लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. सिंगल चैन असलेल्या सायकलींना डबल चैन लावली तर त्या सायकली वेगात धावू शकतात. आणखीन नवनवे प्रयोग करण्याचा विचार आहे.-म. फारुख सय्यद,सायकल दुरुस्ती मेकॅनिक

टॅग्स :Solapurसोलापूर