शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसची अनोखी सायकल रॅली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 14:35 IST

भारतीय जनता पार्टी ही आजची भारतीय जनतेचा पैसा लुटणारी पार्टी झाली आहे : प्रकाश वाले

सोलापूर - केंद्रातील भारतीय जनता पार्टी चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल डिझेल एलपीजी गॅस खाद्यतेलाचा सह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या जीवघेण्या महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले व जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी कॉंग्रेस भवन सोलापूर येथून सायकल रॅली काढण्यात आली.

दरम्यान, रंगभवन मार्गे डफरीन चौक मार्गे नवल पेट्रोलपंप येथे सायकल रॅली विसर्जित करण्यात आली. या रॅलीत बैलगाडीवर शहर अध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील व पदाधिकारी लक्ष वेधून घेत होते. सायकल रॅलीतील कार्यकर्ते मोदी सरकार विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करून मोदी, आणि भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला.

यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार रोजच पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या किमती वाढवत आहे. आणि गॅस सिलेंडरची सबसिडी ही बंद केली आहे. रोजच वाढणारी पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ, खाद्यतेल झाले महाग झाले. दररोज वाढत चाललेली ‌महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांचे कंबरडे मोडले आहे. जगणे कठीण झाले आहे. मनमोहनसिंग यांच्या काळात कच्च्या तेलाचे दर 108 ते 150 रुपये डॉलर प्रति बॅरल असतानाही 72 रुपये पेट्रोलचे दर होते. आज मोदी सरकारच्या कार्यकाळात कच्च्या तेलाचे दर 30 ते 70 डॉलर प्रति बॅरल एवढे कमी झाले असतानाही आज 106.40 रुपये पेट्रोल, डिझेल 95.54 रुपये गॅस सिलेंडर चे 843 रुपये दर सोलापुरात आहेत. संपूर्ण जगभरात इंधनावर सर्वात जास्त कर मोदी सरकार वसूल करत आहे.

देशातील जनता कोरोनाच्या संकटाने, महागाई, बेरोजगारीने त्रस्त झालेली असताना जनतेला आधार देण्याऐवजी मोदी सरकार पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दर सातत्याने वाढवून स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यात मग्न आहे. जनता जगली काय किंवा मेली काय याच्याशी त्यांना काडीमात्र घेणेदेणे नाही. भारतीय जनता पार्टी ही आजची भारतीय जनतेचा पैसा गोळा करणारी पार्टी झाली आहे. म्हणून महागाईच्या आगडोंबात जनतेला होरपळवणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार आम्ही धिक्कार करतो आणि मोदी सरकारच्या निषेधार्थ ही सायकल रॅली काढण्यात आली. मोदी सरकारने इंधनाच्या, गॅस सिलेंडरचे दर ताबडतोब कमी करावे अन्यथा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी सोमपा गटनेते चेतन नरोटे, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, नगरसेवक रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, हाजी तौफिक हत्तुरे, नगरसेविका परवीन इनामदार, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, भटक्या विमुक्त अध्यक्ष भारत जाधव, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, सेवादलचे भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, सुनेत्राताई पवार, दादासाहेब साठे, अर्जुन पाटील, राजेश पवार, गौरव खरात, वसीम पठाण, अशोक कलशेट्टी, हारून शेख, अंबादास गुत्तीकोंडा, मनीष गडदे, केशव इंगळे, नागनाथ कदम, सुनील रसाळे, पशुपती माशाळ, N K क्षीरसागर, अनिल मस्के, रफिक इनामदार, पवन गायकवाड, भोजराज पवार, युवराज जाधव, सौदागर जाधव, आरिफ पठाण, प्रा. सिद्राम सलवदे, हणमंत मोरे, लक्ष्मीनारायण दासरी, चक्रपाणी गज्जम, हाजीमलंग नदाफ, सुनील व्हटकर, नूर अहमद नालवार, विवेक कन्ना, महेशकुमार मस्के, संजय गायकवाड, शोहेब कडेचुर, अंबादास गायकवाड, कोमोरो सय्यद, सुभाष वाघमारे, प्रमिला तुपलवंडे, मुमताज तांबोळी, अनिता भालेराव, माया गायकवाड, अनिल हलकट्टी, जितराज गरड, श्रीकांत दासरी, भारत गायकवाड, लतीफ शेख, उत्तम रणदिवे, रशीद शेख, नागेश काकडे, दत्ता नामकर, शकुर शेख, सोपान थोरात, बसंती साळुंखे, चंदा काळे,  कल्पना वेंनूर, बन्नप्पा कंपली, यांच्यासह इतर पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Solapurसोलापूरcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणPetrolपेट्रोल