अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST2020-12-05T04:44:16+5:302020-12-05T04:44:16+5:30
याबाबत अधिक माहिती, समाधान गायकवाड हे रात्रीच्या वेळी बार्शीहून खांडवीकडे जाताना चांडक पेट्रोलपंपाशेजारील पुलाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. तेव्हा ...

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
याबाबत अधिक माहिती, समाधान गायकवाड हे रात्रीच्या वेळी बार्शीहून खांडवीकडे जाताना चांडक पेट्रोलपंपाशेजारील पुलाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. तेव्हा ते दुचाकीवरून खाली पडल्याने डोक्यास गंभीर जखम झाली. रक्तस्राव होऊन ते जागीच ठार झाले. याबाबत बिभीषण उत्तरेश्वर गव्हाणे यांनी तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर हवालदार राहुल बोदर, अक्षय टोणपे, भगवान राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेथे एमएच १३ बीसी ०२६३ ही दुचाकी पडलेली दिसली. पुढील तपास हवालदार जनार्धन सिरसट करत आहेत.
फोटो
०३समाधान गायकवाड-अपघात