धक्कादायक; ट्रॅक्टरच्या हेडखाली सापडून चालकाचा दुदैवी मृत्यू; बार्शी तालुक्यातील घटना
By Appasaheb.patil | Updated: November 18, 2022 13:24 IST2022-11-18T13:21:37+5:302022-11-18T13:24:47+5:30
अंबाबाईचीवाडी ते जोतिबाचीवाडी या रस्त्यावर रामगिरी विद्यालयाजवळील उतारावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी होऊन ट्रॅक्टरच्या हेडखाली सापडून चालक जागीच मयत झाल्याची घटना वैराग हद्दीत घडली.

धक्कादायक; ट्रॅक्टरच्या हेडखाली सापडून चालकाचा दुदैवी मृत्यू; बार्शी तालुक्यातील घटना
सोलापूर : अंबाबाईचीवाडी ते जोतिबाचीवाडी या रस्त्यावर रामगिरी विद्यालयाजवळील उतारावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी होऊन ट्रॅक्टरच्या हेडखाली सापडून चालक जागीच मयत झाल्याची घटना वैराग हद्दीत घडली. बबन साहेबराव भोसेकर असे मयत चालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या साखर कारखान्याकडे घेऊन जात असताना अंबाबाईची वाडी येथील रामगिरी विद्यालयाजवळच्या उतारावर ट्रॅक्टर अचानक रोडच्या उजव्या बाजूला असलेल्या चारीमध्ये पलटी झाल्याने ट्रॅक्टरच्या हेड खाली सापडून चालक बबन साहेबराव भोसेकर हा जागेवरच मयत झाला आहे.
घटना इतकी गंभीर होती की चालकाच्या अंगावर हेड पडल्यामुळे चालकास कोणतीही हालचाल करता आली नाही. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद काकासाहेब सुभाष भुजबळ यांनी वैराग पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार सोनकांबळे हे करीत आहेत.