औज बंधाऱ्याचा वीजपुरवठा पूर्ववत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST2021-06-18T04:16:31+5:302021-06-18T04:16:31+5:30
औज बंधाऱ्यात सोलापूर शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी उजनी जलाशयातून सोडण्यात आलेले पाणी साठवण्यात येते. बंधाऱ्यातील पाण्याचा बेसुमार उपसा टाळण्यासाठी सोलापूर ...

औज बंधाऱ्याचा वीजपुरवठा पूर्ववत करा
औज बंधाऱ्यात सोलापूर शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी उजनी जलाशयातून सोडण्यात आलेले पाणी साठवण्यात येते. बंधाऱ्यातील पाण्याचा बेसुमार उपसा टाळण्यासाठी सोलापूर महानगरपालिका वीज वितरण कंपनीला वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश देते. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून औज बंधाऱ्याच्या परिसरात केवळ चार तास वीज दिली जात होती.
काँग्रेसचे नेते जाफरताज पाटील यांनी याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे दाद मागितली होती. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीला विजेचा पुरवठा पूर्वीप्रमाणे दररोज आठ तास करण्याचे आदेश दिले. त्याची अंमलबजावणी उद्यापासून करा अशी सक्त सूचना केली.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर मंद्रूप च्या अप्पर तहसीलदार उज्वला सोरटे, नायब तहसीलदार प्रवीणकुमार घम, महावितरणचे अधिकारी कमठणकर, सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय धनशेट्टी, जाफरताज पाटील, सिकंदरताज पाटील आणि शेतकरी उपस्थित होते.
-------
पाच गावांतील शेतीला लाभ
पाणीपुरवठ्याच्या नावाखाली चार महिने दररोज केवळ चार तास वीजपुरवठा केला जात होता आता जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामुळे औज (म), कारकल, कुरघोट, चिंचपूर, टाकळी या पाच गावांतील शेतीला नियमित वीजपुरवठ्याचा लाभ मिळणार आहे.
-----