माणसातला देव समजून घ्या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 13:20 IST2021-01-28T13:20:34+5:302021-01-28T13:20:42+5:30

आध्यात्मिक...

Understand God ...! | माणसातला देव समजून घ्या...!

माणसातला देव समजून घ्या...!

देव हा प्रत्येक माणसात आहे. योग्य दृष्टी निर्माण झाली की मनुष्याला स्वतःमधील देव दिसतो. हा देव समजून घेतला पाहिजे.

अध्यात्मशास्त्र हे शुद्ध शास्त्र आहे. हे शास्त्र शिकलात की मनुष्याच्या समस्या आपोआप सुटतात. समस्येवर मार्गदर्शन करण्यासाठी संतांकडे कधीही पैशाची गरज लागत नाही. तेथे फक्त भक्ती लागते. मनुष्यजन्म हा भक्ती करण्यासाठीच मिळालेला आहे. सत्कर्म करून जास्तीत जास्त पुण्य या जन्मात मिळवावे, पापसुद्धा याच जन्मात दुःखाच्या स्वरुपात फेडावे लागते. जीवनात दुःख निर्माण होणार नाही, यासाठी दिवसातून किमान दहा मिनिटे मन एकाग्र करा. त्यावेळी मनात दुसरा कोणताच विचार आणू नये. मनाला भक्तीचा व्यायाम द्या. असे केल्याने कोणत्याही देवाची माणसाला गरज पडणार नाही. तो स्वतःच स्वतःच्या समस्येवर मात करू शकतो.

- स्वामी नरेंद्रचार्य महाराज

Web Title: Understand God ...!