शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरसाठी सोडलेले उजनीचे पाणी चंद्रभागा नदीत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:17 IST

नौकाविहार सुरू ; विसर्ग वाढविल्याने पाण्याला गती

ठळक मुद्देजानेवारी महिन्यात सोलापूरला पिण्यासाठी उजनीतून पाणी सोडण्यात आलेपंधरा दिवस बंद असलेला होडीचा व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याने नौकाविहारासाठी गर्दी शहरात भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने २३ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून ३००० हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात

पंढरपूर : सोलापूर शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी २८ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पंढरपुरात दाखल झाले आहे़ पंधरा दिवस बंद असलेला होडीचा व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याने नौकाविहारासाठी गर्दी होत असून, कोळी बांधवांतून आनंद व्यक्त होत आहे.

जानेवारी महिन्यात सोलापूरला पिण्यासाठी उजनीतून पाणी सोडण्यात आले होते़ त्यानंतर ते पाणी दोन महिने पुरले़ पुन्हा आता जशी उन्हाची तीव्रता वाढत गेली तशी शहरातील नागरिकांना पुन्हा पाणी कमी पडू लागले़ सुरुवातीला दोन दिवसाआड, पुन्हा तीन, चार आणि त्यानंतर तर पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होऊ लागला़ त्यामुळे शहरात भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने २३ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून ३००० हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली, मात्र वेग कमी असल्यामुळे आणि नदीपात्र कोरडे पडल्याने ते पाणी पुढे सरकण्यास विलंब होऊ लागला़ त्यानंतर २६ मार्च रोजी त्यात वाढ करून ७१०० क्युसेकने पाणी वाढविण्यात आले़ त्यामुळे पाणी गतीने पुढे सरकू लागले़ २८ रोजी सकाळी ७ च्या सुमारास पंढरपुरात ते पाणी दाखल झाले.

हे पाणी गोपाळपूरच्या बंधाºयात धडकल्यानंतर चंद्रभागेतील पाणी पातळीत वाढ झाली़ हे पाणी भक्त पुंडलिक मंदिराच्या पायरीला टेकले आहे़ शिवाय अनेक समाधी आणि मंदिरांना पाण्याने वेढा टाकला आहे़

भाविकांना स्नानाचा आनंद..- चंद्रभागा नदीपात्र कोरडे पडल्याने त्यातील होड्या पलीकडील तीरापर्यंत गेल्या होत्या, मात्र गुरुवारी पाणी आल्यानंतर त्या पाण्याबरोबर भक्त पुंडलिक मंदिरासमोर उभारण्यात आल्या़ गेल्या १५ ते २० दिवसांपासून कोळी बांधवांचा पाण्याअभावी व्यवसाय बंद होता़ तो आता पाणी आल्यामुळे पूर्ववत झाला आहे़ पंढरपुरात रोज येणाºया हजारो  भाविकांनाही चंद्रभागेत पवित्र स्नान करता येऊ लागले़ त्यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होऊ लागले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारीUjine Damउजनी धरणwater shortageपाणीटंचाई