शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

उजनीच्या पाण्याचा प्रश्न पोहोचला मुख्यमंत्र्यांपर्यंत; महापौर शोभा बनशेट्टी यांनी पाठविले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 11:28 IST

सोलापूर : औज बंधारा कोरडा पडून पाच दिवस झाले. जलसंपदा विभाग उजनी धरणातून पाणी सोडण्यास विलंब लावीत आहे. या ...

ठळक मुद्देऔज बंधारा हा शहराच्या पाणीपुरवठ्याच्या प्रमुख स्रोतांपैकी एकबंधाºयातून टाकळी इनटेकमध्ये पाणी घेतले जातेटाकळी इनटेकमध्ये सध्या २५ मार्चपर्यंत पुरेल इतके पाणी

सोलापूर : औज बंधारा कोरडा पडून पाच दिवस झाले. जलसंपदा विभाग उजनी धरणातूनपाणी सोडण्यास विलंब लावीत आहे. या विषयात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी महापौर शोभा बनशेट्टी यांनी केली आहे. 

औज बंधारा हा शहराच्या पाणीपुरवठ्याच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. या बंधाºयातून टाकळी इनटेकमध्ये पाणी घेतले जाते. टाकळी इनटेकमध्ये सध्या २५ मार्चपर्यंत पुरेल इतके पाणी आहे. उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी औज बंधाºयापर्यंत पोहोचण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. उजनीतून १५ मार्चपर्यंत पाणी सोडावे, असे पत्र महापालिका प्रशासनाने जलसंपदा विभागाला दिले आहे. जानेवारी महिन्यात सोडलेले पाणी १० एप्रिलपर्यंत पुरवावे, असे जलसंपदा विभागाने महापालिकेला सांगितले होते. पण कर्नाटक हद्दीतून बेसुमार उपसा झाल्याने औज बंधाºयातील पाणी लवकर संपले. 

सध्या उजनीतून कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे. तोपर्यंत भीमा नदीत पाणी सोडता येणार नसल्याची अडचण जलसंपदा विभागाने सांगितली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी नुकतेच लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले होते, पण कार्यवाही झालेली नाही. 

विरोधकांनी मनपामध्ये केला होता गोंधळ 

-शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा आणि उजनी धरणातून लवकर पाणी सोडावे, या मागणीसाठी काँग्रेस, बसपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी गुुरुवारी सकाळी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या कार्यालयात घोषणाबाजी केली होती. शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यास सोलापूर बंद करू, असा इशाराही देण्यात आला होता. पण या विषयाचे राजकारण करू नका, आम्ही पाठपुरावा करीत आहोत, असे महापौर बनशेट्टी यांनी सांगितले. यादरम्यान, महापौर बनशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यास लोक नाराज होतील. त्यामुळे जलसंपदा विभागाला पाणी सोडण्याबाबत तत्काळ आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. 

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार महापालिकेने औज बंधाºयातील पाणी १० एप्रिलपर्यंत पुरविणे अपेक्षित होते, पण त्यांनी पाण्याचे संरक्षण केले नाही. सध्या कालव्यांमधून सिंचनासाठी पाणी सोडलेले आहे. शेतकºयांची गरज महत्त्वाची आहे. हे पाणी बंद करून भीमा नदीत पाणी सोडावे लागेल, पण आम्ही लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. - धीरज साळेअधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस