शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘उजनी’ पोहोचली शंभरीच्या उंबरठ्यावर; ९५ टक्के पाणीसाठ्याने धरण हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 15:57 IST

९५ टक्के पाणीसाठा :  मात्र आऊट गोईंग बंद, शेतकरी वर्गातून आनंद

टेंभुर्णी : मागील ४८ तासांत उजनी धरणात सुमारे दोन टीएमसी पाणी आल्याने धरणातील पाणीसाठा तीन टक्क्याने वाढून धरण ९५.३९ टक्के भरले आहे. उजनी धरणाने ९५ टक्क्यांची पातळी ओलांडल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. उजनी धरण शंभरीकडे वाटचाल करीत असले तरी धरणातून आऊट गोईंग मात्र जवळपास पूर्णपणे बंद आहे.

मागील वर्षी उजनी धरण सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच भरले होते. चालू वर्षी मात्र ते बरेच दिवस ८० टक्के यावरच रेंगाळत असल्याने शेतकरी वर्गातून काहीशी चिंता व्यक्त केली जात होती. आता धरण ९५ टक्के भरल्याने उर्वरित काळात ते शंभर टक्के भरणार याची खात्री निर्माण झाल्याने सर्वच स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता उजनी धरण ९२.४७ टक्के भरले होते. शनिवारी सायंकाळी धरण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहे. म्हणजे मागील ४८ तासांत तीन टक्क्याने वाढ झाली आहे.

उजनी धरण क्षेत्रात आतापर्यंत एकूण ४६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी एका दिवसात १२ मिमी पाऊस पडला. उजनी धरणाच्या वरील बाजूस भीमा नदीवर असलेल्या १९ धरणांपैकी बहुतेक धरणे शंभर टक्के भरल्याने या धरणातून वेळोवेळी पाणी सोडलेले उजनी धरण १०० टक्क्यांकडे वाटचाल करीत आहे. शुक्रवारी सायंकाळी दौंड येथून ४०५८ क्युसेक विसर्ग चालू होता. त्यामध्ये शनिवारी थोडी वाढ झाली असून, सायंकाळी ४९०५ क्युसेक विसर्ग चालू आहे, तर बंडगार्डन येथून २९१६ क्युसेक  विसर्ग चालू आहे.

उजनी धरण शंभरीकडे वाटचाल करीत असले तरी धरणातून आऊट गोईंग मात्र जवळपास पूर्णपणे बंद आहे. सीना माढा उपसा सिंचनसाठी २५९ क्युसेक, तर दहिगाव उपसा योजनेसाठी ६३ क्युसेकने पाणी वापरले जात आहे.

 

 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूकwater shortageपाणीकपात