शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पदवी नसतानाही यु.एफ. जानराव बनले डॉक्टर; ३८ वर्षापासून कृष्ठरोग्यांची सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 14:09 IST

लक्ष्मण कांबळे ।  लऊळ : चाळीस वर्षांपूर्वी काही युरोपियन लोक माढ्यात आले. त्यांनी तेथे मिशनरी हॉस्पिटल चालू केले. दिवसभर ...

ठळक मुद्दे१९९२ पासून शासकीय सेवेत कुष्ठरोग तंत्रज्ञ म्हणून कुष्ठरोग्यांची सेवा सुरूकुष्ठरोग्यांची सेवा सुरू केली आणि बघता बघता ते त्यांचे देवदूतच बनले माढा, बार्शी व पंढरपूर तालुक्यातील कुष्ठरोग्यांची सेवा करण्यातच रमले

लक्ष्मण कांबळे । 

लऊळ : चाळीस वर्षांपूर्वी काही युरोपियन लोक माढ्यात आले. त्यांनी तेथे मिशनरी हॉस्पिटल चालू केले. दिवसभर फिरून रूग्णांवर ते उपचार करत असत. युरोपियन लोक सातासमुद्रापार येऊन इथल्या रूग्णांची सेवा करतात, मग आपण का करू नये, हा विचार यु. एफ. जानराव यांच्या मनात आला. त्यांनी हा विचार कृतीत उतरविला़ अकरा वर्षे आरोग्यसेवा केली. त्यानंतर १९९२ पासून शासकीय सेवेत कुष्ठरोग तंत्रज्ञ म्हणून कुष्ठरोग्यांची सेवा सुरू केली आणि बघता बघता ते त्यांचे देवदूतच बनले. 

३८ वर्षे झालीत. ते माढा, बार्शी व पंढरपूर तालुक्यातील कुष्ठरोग्यांची सेवा करण्यातच रमले आहेत. १९८० च्या दशकात राज्यातील ग्रामीण व शहरी भागात कुष्ठरूग्ण जास्त प्रमाणात होते. त्यावेळी समाजात या रोगाबद्दल गैरसमज व अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात होती. अशा काळात कुष्ठरोग्यांची सेवा करून त्यांचे अश्रू पुसण्याचे काम यु.एफ. जानराव यांनी अविरतपणे केले.

या सेवेमुळेच त्यांना रूग्णांनी डॉक्टर ही पदवी बहाल केली. बार्शी तालुक्यातील संगमनेर येथे गरीब कुटुंबात जन्मलेल्या जानराव यांनी मॅकेनिकल इंजिनिअर होण्याचे स्वप्न बाळगले होते. पण नियतीने त्यांना वेगळ्याच वाटेवर धाडले. गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांची प्रेरणा घेऊन कुष्ठरोग निवारणासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले. 

विवाह जमवून कौटुंबिक पुनर्वसन...- त्यांच्या या सामाजिक कामाची दखल विविध सामाजिक संस्थांनी घेत राज्यस्तरीय २३ पुरस्कार बहाल केले आहेत. याशिवाय १५ वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे साहित्य क्षेत्रातील कार्यही वाखाणण्याजोगे आहे. कुष्ठरोग्यांची नुसती सुश्रुषा करून ते थांबले नाहीत तर शासकीय योजनेतून त्यांचे संसार उभे केले. अनेकांचे विवाह जमवून त्यांचे कौटुंबिक पुनर्वसन केले. शासनाने याची दखल घेऊन पुरस्कारासोबत आगाऊ वेतनवाढीही दिल्या आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स