शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उद्यान, गोलगुंबज अन् सिद्धेश्वर एक्सप्रेस दहा दिवस हाऊसफुल्ल

By appasaheb.patil | Updated: November 21, 2020 13:29 IST

सोलापूर रेल्वे स्थानकावर गर्दी; दिवाळी सुट्यांमुळे प्रवासी संख्येत वाढ

ठळक मुद्देमध्य रेल्वे विभागातील सर्वात महत्त्वाचे स्थानक म्हणून सोलापूर रेल्वे स्थानकाला ओळखले जातेकर्नाटक, आंध्रप्रदेश, मराठवाड्याला जोडणारा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणून सोलापूरला ओळखले जाते

सोलापूर : दिवाळी सुट्यांमुळे मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील सर्वच स्थानकांवर प्रवाशांनी मोठी गर्दी केली आहे. मागील पंधरा दिवसांपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवासीसंख्येत वाढ झाली. सोलापूर विभागातून धावणारी उद्यान, गोलगुंबज अन् सिद्धेश्वर एक्सप्रेसचे आरक्षण फुल्ल झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

मध्य रेल्वे विभागातील सर्वात महत्त्वाचे स्थानक म्हणून सोलापूर रेल्वे स्थानकाला ओळखले जाते. कर्नाटक, आंध्रप्रदेश, मराठवाड्याला जोडणारा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणून सोलापूरला ओळखले जाते. दिवाळीनिमित्त सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या सर्वच एक्सप्रेस गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. सोलापूरमार्गे म्हैसूरला जाणारी गोलगुंबज एक्सप्रेसला सर्वाधिक प्रवाशांची गर्दी आहे. याशिवाय मुंबईहून बेेंगलोरला जाणारी उद्यान एक्सप्रेस व सोलापूर ते मुंबई नियमित धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या सर्वच सीटचे आरक्षण फुल्ल झाले आहे.

दरम्यान, बेंगलोरमार्गे नवी दिल्ली धावणारी कर्नाटक एक्सप्रेस व गदगहून मुंबईला जाणारी गदग एक्सप्रेस, हैद्राबादहून मुंबईला जाणाऱ्या हुसेनसागर एक्सप्रेस गाडीलाही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दिवाळी सुटीनिमित्त प्रवासी पर्यटन, धार्मिकस्थळांना भेटी देण्यासाठी प्रवास करीत आहेत.

या गाड्यांमध्ये आरक्षण फुल्ल

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी उद्यान, गोलगुंबज, सिद्धेश्वरबरोबरच गदग व हुसेनसागर, कर्नाटक एक्सप्रेस गाडीचे आरक्षण फुल्ल झाले आहे. दिवाळी सुटीनिमित्त प्रवासी पर्यटन, देवदर्शनासह वैयक्तिक कामानिमित्त रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवास करीत आहेत.

जिल्ह्यात रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ

दिवाळीमधील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. गाडी क्रमांक ०२०३१-०२०३२ पुणे-गोरखपूर-पुणे फेस्टिव्हल गाडी २३ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे. ही एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.

महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळा

  • सिद्धेश्वर एक्सप्रेस १०.५५ - ०६.५० (सोलापूर ते मुंबई)
  • उद्यान एक्स्प्रेस ११.२० - ११.३०  (मुंबई ते बेंगलोर)
  • गोलगुंबज एक्सप्रेस ०२.१० - ०२.१५ (सोलापूर ते म्हैसूर)
  • गदग एक्सप्रेस ०५.२० - ०५.२५  (गदग ते मुंबई)
  • हुसेनसागर एक्सप्रेस ०५.२५ - ०५.३५  (हैद्राबाद ते मुंबई)
टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेDiwaliदिवाळीcentral railwayमध्य रेल्वे