शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील आंबेडकरवादी युवक संघटनांनी रोखली उद्यान एक्सप्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 15:13 IST

हाथरस अत्याचारप्रकरणी व्यक्त केला निषेध; उत्तर प्रदेश सरकारविरूध्द जोरदार घोषणाबाजी

ठळक मुद्देया ठिकाणी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स व स्थानिक पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेआंदोलकांनी थांबवलेली उद्यान एक्स्प्रेस लगेच मुंबईकडे रवाना करण्यात आली उत्तर प्रदेशातील हाथरस येथे जो घृणास्पद प्रकार घडला आहे

सोलापूर : उत्तर प्रदेशातील हाथसर येथील युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोलापूर शहरातील आंबेडकरवादी युवक संघटनांनी रेले रोको आंदोलन केले. सोलापूरहून मुंबईकडे निघालेली उद्यान एक्सप्रेस शेटेवस्ती येथे १० मिनिटे रोखून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध नोंदविला.

योगी सरकारला या घटनेत सहआरोपी करून तिथल्या पोलिस प्रशासनाला व या षड्यंत्रात जे कोणी सामील आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावेत व पीडित युवतीला न्याय द्यावा. जोपर्यंत पीडितेला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आंबेडकरवादी युवक संपूर्ण महाराष्ट्रात असेच आंदोलन करत राहणार, असा इशारा देत सोलापुरातील डेमोक्रॅटिक यूथ फ्रंट या आंबेडकरवादी संघटनेना दिला.

 या वेळी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे जो घृणास्पद प्रकार घडला आहे, आमच्या भगिनीवर बलात्कार करून तिच्या परिवारातील सदस्यांच्या परवानगीविना तिच्यावर परस्पर अंतिम संस्कार करून संविधानाला गालबोट लावण्याचा लांच्छनास्पद प्रकार घडला आहे. योगी व मोदी सरकार तेथील बहुजनांचा आवाज दाबू पाहात आहे. पीडित युवतीला जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत राज्यभरात असेच तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

सदरचे रेल रोको आंदोलन यशस्वी करण्यासाठी सत्यजित वाघमोडे, अतिष बनसोडे, सोहन लोंढे, अनुराग सुतकर, सुमित शिवशरण, मनोज भालेराव, आकाश साबळे, अक्षय चंदनशिवे, अभी शिंगे, सिध्दांत नागटिळक व डेमोक्रेटीक युथ फ्रंट, सोलापूरचे शेकडो तरूण कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले़ -----------आंदोलकांना घेतले ताब्यात...या ठिकाणी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स व स्थानिक पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलकांनी थांबवलेली उद्यान एक्स्प्रेस लगेच मुंबईकडे रवाना करण्यात आली. यासंबंधी अधिक माहिती घेऊन आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती फौजदार चावडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी दिली.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेUttar Pradeshउत्तर प्रदेशHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार