उदय पाटील यांचा मुंबईत भाजपमध्ये प्रवेश; सोलापूरच्या दोन देशमुखांची उपस्थिती
By राकेश कदम | Updated: March 21, 2023 15:26 IST2023-03-21T15:26:03+5:302023-03-21T15:26:48+5:30
शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी

उदय पाटील यांचा मुंबईत भाजपमध्ये प्रवेश; सोलापूरच्या दोन देशमुखांची उपस्थिती
सोलापूर : येथील दादाश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय पाटील यांनी मंगळवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईच्या भाजप कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचा पंचा आणि हार घालून उदय पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश झाल्याचे जाहीर केले. यावेळी भाजपचे आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार श्रीकांत भारतीय उपस्थित होते. या प्रवेशामुळे सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या राजकारणात नव्या समीकरणांचा उदय झाल्याची चर्चा आहे.