ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकने बाईकला कट मारल्यानं दोन तरुण गंभीर जखमी
By विलास जळकोटकर | Updated: February 1, 2024 17:42 IST2024-02-01T17:42:05+5:302024-02-01T17:42:36+5:30
सोलापूर : नळदुर्गहून होटगी स्टेशनकडे दुचाकीवरुन चाललेल्या दुचाकीस्वाराला समोरुन येणाऱ्या ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला कट मारल्याने दोघे तरुण रोडवर ...

ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकने बाईकला कट मारल्यानं दोन तरुण गंभीर जखमी
सोलापूर : नळदुर्गहून होटगी स्टेशनकडे दुचाकीवरुन चाललेल्या दुचाकीस्वाराला समोरुन येणाऱ्या ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला कट मारल्याने दोघे तरुण रोडवर पडून गंभीर जखमी झाले. गुरुवारी (दि. १) मुळेगाव पाटीजवळ हा अपघात झाला. यश शिवाजी मुळे (वय- २६), सोमनाथ संतोष सावंत (वय- २३, दोघे रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर) असे जखमींची नावे आहेत.
यातील जखमी दोघे नळदुर्ग या त्यांच्या मुळ गावाहून होटगी स्टेशनकडे स्वत:च्या दुचाकीवरुन जात होते. दुपारी त्यांची दुचाकी मुळेगाव पाटीजवळील रोडपर्यंत आली असताना पाठमागून सुसाट वेगानं येणाऱ्या मालट्रककडून ओव्हरटेक करताना दुचाकीला कट मारल्यामुळे दुचाकीवरील दोघे रोडवर पडले. यामुळे त्यांच्या डोक्याला, तोंडास, डाव्या हातास गंभीर मार लागला. दोघांना त्यांचा मित्र प्रशांत चव्हाण याला खबर मिळताच तो घटनास्थळी धावला. तातडीने येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून, दोघेही शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.