दुचाकीस्वारास ट्रकने ठोकरले, दोघे जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 21:21 IST2017-10-11T21:21:07+5:302017-10-11T21:21:18+5:30

मद्यधुंद अवस्थेत ट्रकचालकाने दुचाकीला मागुन धडक देऊन अंगावरुन ट्रक नेल्याने दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला़ ही घटना ११ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडी टेंभुर्णी रोडवरील कुर्डू हद्दीतील दत्त मंदीराजवळ घडली.

Two-wheeler hit the truck, both killed on the spot | दुचाकीस्वारास ट्रकने ठोकरले, दोघे जण जागीच ठार

दुचाकीस्वारास ट्रकने ठोकरले, दोघे जण जागीच ठार


आॅनलाइन लोकमत सोलापूर
कुर्डूवाडी दि ११ : मद्यधुंद अवस्थेत ट्रकचालकाने दुचाकीला मागुन धडक देऊन अंगावरुन ट्रक नेल्याने दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला़ ही घटना ११ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडी टेंभुर्णी रोडवरील कुर्डू हद्दीतील दत्त मंदीराजवळ घडली.  सुहास भारत चव्हाण (वय ३२ रा.लव्हे), नवनाथ धोंडीबा गोरे (वय ४५ रा.सापटणे भोसे) अशी मयतांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद गौतम सर्जेराव राऊत (वय २८ रा.सापटणे भोसे) यांनी कुर्डूवाडी पोलीसात दिली़
    याबाबत माहिती अशी की, कुर्डूवाडी कडून टेंभुर्णीकडे मोटारसायकलवरुन फिर्यादी जात असताना त्याच्या समोरील ट्रक नं.एमएच ४२ टी ९६३० चा चालक मधुकर बबन सुतार (वय ४५ रा.कळस ता.इंदापूर जि.पुणे) याने दारुच्या नशेत त्याच्या ताब्यातील ट्रक हयगयीने, अविचाराने रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात चालवून त्याच्या समोरील मोटारसायकल नं.एमएच ४५ एक्स ०७३६ वरील चालक सुहास भारत चव्हाण वय ३२ रा.लव्हे ता.माढा व पाठीमागे बसलेला नवनाथ धोंडीराम गोरे वय ४५ रा.सापटणे भो ता.माढा यांना पाठीमागुन जोराची धडक देवून त्यांच्या अंगावरुन टकची चाके जावून मार लागुन ते गंभीर जखमी झाले व जागीच मयत झाले.
    अपघातामधील मोटारसायकल स्वारांना मरणासन्न अवस्थेत सोडून त्याची पर्वा नकरता, अपघाताची खबर न देता टक चालक तासाच निघून पळून जात असताना फिर्यादीने त्याला थांबविले़ याबाबत फियादी गौतम सर्जेराव राऊत (वय २८ रा.सापटणे भोसे ता.माढा ) यांच्या फिर्यादीवरुन कुर्डूवाडी पोलीसात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बेदरे हे करीत आहेत.

Web Title: Two-wheeler hit the truck, both killed on the spot