दुचाकीला लक्झरी बसची धडक, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:26 IST2021-08-27T04:26:26+5:302021-08-27T04:26:26+5:30

सचिन बाबूराव देशमाने (वय-३९ रा. बामणी, ता. तुळजापूर, सध्या रा. मोहोळ) असे त्या मयत व्यक्तीचे नाव आहे. ते ...

Two-wheeler hit by luxury bus, one killed | दुचाकीला लक्झरी बसची धडक, एक ठार

दुचाकीला लक्झरी बसची धडक, एक ठार

सचिन बाबूराव देशमाने (वय-३९ रा. बामणी, ता. तुळजापूर, सध्या रा. मोहोळ) असे त्या मयत व्यक्तीचे नाव आहे. ते गेल्या सात वर्षांपासून मोहोळ येथील चंद्रमोळी एमआयडीसी येथे ड्रायव्हर म्हणून काम करीत होते. दि.२६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकल (क्रमांक एम.एच २५, ए.सी ९०१४) वरून त्यांचा लहान मुलगा पृथ्वीराज सचिन देशमाने याला घेऊन कंपनीकडे निघाले होते. ते दोघे चंद्रमौळी चौकातून कंपनीकडे वळत असताना मोहोळकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या लक्झरी बसने (क्रमांक एम.एच १२, क्यू.जी.९०१६) धडक दिल्याने सचिन देशमाने यांच्या डोक्यास जबर मार लागून ते जागीच मयत झाले. तर मुलगा पृथ्वीराज देशमाने या प्रकाराने घाबरून गेला आहे. अपघातानंतर लक्झरी बसच्या चालकाने पलायन केले. त्यामुळे लक्झरी बसच्या चालकाविरोधात पांडुरंग सिद्धेश्वर देशमाने यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश शिंदे हे करीत आहेत.

Web Title: Two-wheeler hit by luxury bus, one killed