त्या दोघांनी दारू जागेवर टाकून पळ काढला; कारण जाणून थक्क व्हाल...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:49 IST2020-08-26T12:49:01+5:302020-08-26T12:49:13+5:30

सोलापूर शहरातील घटना

The two threw the liquor on the spot and fled; Because you will be surprised to know ...! | त्या दोघांनी दारू जागेवर टाकून पळ काढला; कारण जाणून थक्क व्हाल...!

त्या दोघांनी दारू जागेवर टाकून पळ काढला; कारण जाणून थक्क व्हाल...!

सोलापूर : अक्कलकोट रोडवरील यशराज नगरसमोर हातभट्टी दारू वाहतूक करणाºयांबरोबर पोलिसांची झटापट झाली. दारू जागेवर टाकून पळून गेलेल्या दोन व्यक्तींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार २३ आॅगस्ट रोजी रात्री घडला.

पोलीस कॉन्स्टेबल मोहसीन जहांगीर शेख (वय २३) हे होमगार्ड समवेत दुचाकीवरुन पेट्रोलिंग करीत होते. तेव्हा त्यांना हातभट्टी दारू सुनील नगरमधून एमआयडीसीकडे जात असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून दोघे छत्रपती चौकात थांबले, तेव्हा मोटरसायकलवरून (एम.एच. १३ डी डी ८६९५) वेगात हातभट्टी दारू घेऊन जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते न थांबता भरधाव वेगात पुढे निघून गेले.  पाठलाग केला असता त्यांनी झटापट केली. 

Web Title: The two threw the liquor on the spot and fled; Because you will be surprised to know ...!