शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

मुळेगांव तांड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीसांवर दगडफेक, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी जखमी, ६५ लोकांविरूध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 16:03 IST

मुळेगांव तांडा (ता़ उ़ सोलापूर) येथे अवैध दारू भट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस पथकावर अवैध धंदे करणाºयांनी दगडफेक केली़ या दगडफेकीत पोलीस कॉन्स्टेबल शेख (बक्कल नंबर २६२) व अकुलवार (बक्कल नंबर २०२१) हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री घडली़ याप्रकरणी पोलीसांनी ६५ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे़ 

ठळक मुद्देभानुदास तांड्यावर अचानक धाड टाकली़ या धाडीत १४ लाख ५६ हजार ४०० रूपयांची हातभट्ठी तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन पोलीसांनी नष्ट केले़ गैर कायद्याची मंडळी जमवून सरकारी कामात अडथळा आणून पोलीसांवर दगडफेक करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली़४० ते ५० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास सपोनि देवडे हे करीत आहेत़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : मुळेगांव तांडा (ता़ उ़ सोलापूर) येथे अवैध दारू भट्टीवर कारवाईसाठी गेलेल्या सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस पथकावर अवैध धंदे करणाºयांनी दगडफेक केली़ या दगडफेकीत पोलीस कॉन्स्टेबल शेख (बक्कल नंबर २६२) व अकुलवार (बक्कल नंबर २०२१) हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री घडली़ याप्रकरणी पोलीसांनी ६५ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे़ सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मुळेगाांव तांडा (भानुदास तांडा ता़ द़ सोलापूर) येथे चालणारे अवैध धंदे दारू भट्टीवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी पोलीस ठाण्याकडील कर्मचारी, पोलीस मुख्यालयातील आरसीपीचे कर्मचारी पोलीसांनी भानुदास तांड्यावर अचानक धाड टाकली़ या धाडीत १४ लाख ५६ हजार ४०० रूपयांची हातभट्ठी तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन पोलीसांनी नष्ट केले़ दरम्यान, सुरेश कपूरचंद राठोड (भानुदास तांडा, ता़ द़ सोलापूर) यांच्या अवैध रित्या चालणाºया धंद्यावर पोलीसांनी धाड टाकली़ यावेळी भट्टी तयार करण्याकरिता लागणारे साहित्य, बॅटरीच्या शेलचे तुकडे, नवसागर, युरियाचे दोन पोते, हातभट्टीने भरलेले टयुबा होत्या़ सदर गाडीजवळ चालक उभा असताना पोलीसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते गाडीसह साहित्य घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले़ या गाडीचा पाठलाग करीत असताना पोलीसांना दिपक ट्रान्सपोर्ट समोरील हायवे रोडवर ही गाडी मिळून आली़ मात्र यावेळी संबंधित गाडीजवळ असलेल्या लोकांनी गैर कायद्याची मंडळी जमवून सरकारी कामात अडथळा आणून पोलीसांवर दगडफेक करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात सुभाष काशीनाथ चव्हाण, विक्रम बाबु पवार, नागेश शंकर पवार, विलास शिवाजी जाधव, सुरेश कपूरचंद राठोड, अजय पवार, लालू राठोड, सविता रमेश राठोड, इंदू राजू पवार, सनद लालू राठोड, श्रीनाथ कपूरचंद राठोड व इतर अज्ञात ४० ते ५० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास सपोनि देवडे हे करीत आहेत़भानुदास तांड्यावर टाकण्यात आलेल्या धाडीची कारवाई पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, सपोनि देवडे,पोहेकॉ गायकवाड, गुंडाळे, पवार, चवरे, टिंगरे, गवळी, पोनाकरे, कोरे, पवार, पोकॉ खांडेकर, शेख, मोटे, फडतरे, मपोना कोकणे, चासपोफौ पवार तसेच पोलीस मुख्यालयाकडील आरसीपी पथकचे पोलीस कर्मचारी यांनी कारवाई पार पाडली़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस