शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा दोन लाख जप्त! सराफ दुकानातून बांगड्या चोरणाऱ्या ‘काला कौवा’ला कर्नाटकात जाऊन केलं जेरबंद

By विलास जळकोटकर | Updated: November 30, 2023 19:05 IST

कर्नाटकात असल्याचा सुगावा लागताच गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातील बीदर येथे जाऊन पकडले.

सोलापूर : नेहमीच गजबलेल्या असणाऱ्या शहरातील सराफ दुकानातून दिवसाढवळ्या दागिने पाहण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा चोरट्यांनी सोन्याच्या चार बांगड्या चोरल्या होत्या. हे आरोपी कर्नाटकात असल्याचा सुगावा लागताच गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातील बीदर येथे जाऊन पकडले. त्याच्याकडून ४०. ४५० ग्रॅम वजनाचा २ लाख ३२ हजार रुपयांचा मद्देमाल जप्त करण्यातर आला. त्याच्या अन्य एका साथीदाराचा शोध सुरु आहे.

सराफ गल्ली झालेल्या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व सहकाऱ्यांनी अशा स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या आरोपींच्या गुन्हे कार्यप्रणालीचा अभ्यास करताना खबऱ्याकडून संबंधित आरोपी कर्नाटकातील बीदर येथे असल्याचे समजले. त्यानंतर पथकातील सपोनि जीवन निरगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्नाटकातील बीदर येथे जाऊन तेथील पोलिसांच्या मदतीने इराणी गल्लीत जहिद उर्फ हैदरअली उर्फ काला कौवा जावेदअली इराणी याला चिद्री बीदर रोड येथून ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्यानं त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सराफ दुकानातील चोरी केल्याची कबुली दिली. या चोरीतल्या ४.७५० ग्रॅम वजनाच्या २ लाख ३२ हजार रुपयांच्या सोन्यांच्या बांगड्या काढून दिल्या. हा गुन्हा जोडभावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने आरोपील त्यांच्याकडे ताब्यात दिले आहे. यातील आरोपीचा साथीदार रजा हुसेन उर्फ रजिया अफसर अली इराणी याचा शोध सुरु आहे. अन्य दोन गुन्ह्यांचाही छडाशहरात दुचाकीचोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सपोनि विजय पाटील यांच्या पथकाची मोहीम सुरु असताना २५ नोव्हेंबर रोजी अदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी (वय- २८, रा. बिलाल नगर, वजापूर रोड, सोलापूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी व लॅपटॉप जप्त करण्यात आला. हा आरोपी विजापूर नाका पोलीस ठाण्यास चोरीतील गुन्ह्यासाठी हवा होता. सराफ दुकानातील चोरीच्या मुद्देमालासह गुन्हे शाखेच्या पथकाकडून ३ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 

टॅग्स :SolapurसोलापूरtheftचोरीPoliceपोलिस