शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा दोन लाखांची लाच घेणाºया तलाठ्यासह दोघांना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 09:07 IST

सोलापूर : सात-बारा उतारा देण्यासाठी सव्वादोन लाख रुपयांची लाच स्वीकारणाºया तलाठ्यासह एका खासगी इसमास सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा न्यायाधीश आर. व्ही. सावंत-वाघुले यांनी सुनावली.तलाठी जालिंदर कल्लप्पा सप्ताळे (वय ५३, रा. गावडेवाडी, दक्षिण सोलापूर ) याला चार वर्षे सक्तमजुरी तर खासगी इसम बापू शंकर कोकरे (वय ५३, रा. होटगी स्टेशन, दक्षिण सोलापूर) ...

ठळक मुद्देसरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले तक्रारदार व पंच यांच्या साक्षी अतिशय महत्त्वपूर्ण ठरल्यासरकारतर्फे अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत तर आरोपीतर्फे अ‍ॅड. एम. एम. अग्रवाल यांनी काम पाहिले

सोलापूर : सात-बारा उतारा देण्यासाठी सव्वादोन लाख रुपयांची लाच स्वीकारणाºया तलाठ्यासह एका खासगी इसमास सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा न्यायाधीश आर. व्ही. सावंत-वाघुले यांनी सुनावली.

तलाठी जालिंदर कल्लप्पा सप्ताळे (वय ५३, रा. गावडेवाडी, दक्षिण सोलापूर) याला चार वर्षे सक्तमजुरी तर खासगी इसम बापू शंकर कोकरे (वय ५३, रा. होटगी स्टेशन, दक्षिण सोलापूर) यास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.तक्रारदार यांची होटगी येथे वडिलोपार्जीत जमीन आहे. त्यापैकी काही क्षेत्रामध्ये तहसीलदार यांचे बिगरशेती आदेश पास झाले. नंतर बिगरशेती क्षेत्रामध्ये तक्रारदार यांनी ८४ प्लॉट पाडून त्यापैकी ३० प्लॉटची विक्री केली. त्यांनी शिल्लक सात प्लॉटची विक्री करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी तलाठी जालिंदर सप्ताळे यांच्याकडे सात-बारा उताºयाची मागणी केली असता त्याने हे काम करण्यासाठी पैशाची मागणी केली. तडजोडीअंती दीड लाख रुपयाची लाच देण्याचे ठरले.

तक्रारदार यांच्या भाच्याने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केली असता, त्यात ४ मार्च २०१० रोजी सप्ताळे याने तक्रारदार यांच्या घरी जाऊन कोकरे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी करण्यासाठी तीन दिवसात कागदपत्रासह हजर राहण्याची नोटीस बजावल्याचे सांगितले. तडजोड करुन प्रकरण मिटवतो असे सांगितले. त्यासाठी तलाठी जालिंदर कल्लप्पा सप्ताळे स्वत:साठी दीड लाख रुपये तर खासगी इसम बापू शंकर कोकरे याला ७५ हजार रुपये असे एकूण २ लाख २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

चार साक्षीदार तपासले- सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी तक्रारदार व पंच यांच्या साक्षी अतिशय महत्त्वपूर्ण ठरल्या. या प्रकरणी जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी आरोपींना जास्तीच्या शिक्षेची मागणी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन तलाठी जालिंदर कल्लप्पा सप्ताळे (वय ५३,रा. गावडेवाडी,दक्षिण सोलापूर) याला चार वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंडाची शिक्षा तर खासगी इसम बापू शंकर कोकरे (वय ५३,रा. होटगी स्टेशन, दक्षिण सोलापूर) यास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व आणि तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. यात सरकारतर्फे अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत तर आरोपीतर्फे अ‍ॅड. एम. एम. अग्रवाल यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी पोकॉ चंद्र पल्ल यांनी मदत केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयPoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग