विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी दोन लाख भाविक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 05:08 AM2019-04-17T05:08:37+5:302019-04-17T05:08:42+5:30

चैत्री यात्रेच्या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे दोन लाखांहून अधिक भाविकांनी पंढरपुरातील चंद्रभागेत पवित्र स्नान करून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले़

Two lakh devotees on the feet of Vitthal and Rukmini | विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी दोन लाख भाविक

विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी दोन लाख भाविक

Next

पंढरपूर (जि़ सोलापूर) : चैत्री यात्रेच्या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे दोन लाखांहून अधिक भाविकांनी पंढरपुरातील चंद्रभागेत पवित्र स्नान करून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले़ कामदा एकादशी (चैत्री वारी) आणि शिखर शिंगणापूरची यात्रा एकाचवेळी असल्याने काही भाविकांनी कावडीला चंद्रभागा स्नान करून शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान केले़
चंद्रभागेत भाविकांनी पवित्र स्नानासाठी गर्दी होती़ स्नान करून भाविक विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शन रांगेत सहभागी होत होते़ त्यामुळे ही दर्शन रांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेड क्रमांक ६ पर्यंत गेली
होती. काही भाविकांनी चंद्रभागा स्नान, मुखदर्शन, नामदेव पायरीचे दर्शन, कळस दर्शन घेऊन नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. मंदिरात फुलांची आकर्षक पद्धतीने सजावट केली होती़
पांडुरंगाला पुरणपोळीचा नैवेद्य
पांडुरंगाला पुरणपोळीचा खास महानैवेद्य दाखविण्यात आला़ पुरणपोळी, साखर भात, शेवयाची खीर, श्रीखंड, पापट, आळुच्या वड्या असा पंचपक्वानाचा महानैवेद्य बनविला होता़ शिवाय विड्याऐवजी लवंग, वेलदोडे ठेवण्यात आले होते़
>शिखर शिंगणापूरच्या कावडी पंढरीत
शिखर शिंगणापूर येथे सध्या शंभू महादेवाची यात्रा सुरू आहे़ मराठवाड्यातील भाविक कावडीसह शंभू महादेवाच्या यात्रेसाठी निघाले आहेत़ पंढरपुरात मंगळवारी चैत्री वारी असल्याने चंद्रभागेत कावडीला स्नान घालून चंद्रभागेचे पाणी घेऊन जातात़ शिवाय जाताना अनेक भाविकांनी मुख दर्शन, नामदेव पायरी दर्शन, कळस दर्शन घेतले़ भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर, महाद्वार घाट फुलून गेला होता़ दर्शन घेतले भाविक कावडीसह शिखर शिंगणापूरकडे मार्गस्त होत होते़

Web Title: Two lakh devotees on the feet of Vitthal and Rukmini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.