म्हशी चोरणाऱ्या दोघांना तीन दिवस पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:48 IST2021-09-02T04:48:25+5:302021-09-02T04:48:25+5:30
सद्दाम तांबोळी (रा. बेगमपूर) यांची तामदर्डी शिवारात शेती आहे. या शेतातील गोठ्यात म्हशी बांधल्या होत्या. २२ ते २३ जुलैच्या ...

म्हशी चोरणाऱ्या दोघांना तीन दिवस पोलीस कोठडी
सद्दाम तांबोळी (रा. बेगमपूर) यांची तामदर्डी शिवारात शेती आहे. या शेतातील गोठ्यात म्हशी बांधल्या होत्या. २२ ते २३ जुलैच्या दरम्यान रात्री ३० हजार रुपये किमतीच्या दोन म्हशी वरील दोघांनी चोरून नेल्या होत्या. याबाबत मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करून याचा तपास पोलीस हवालदार दयानंद हेंबाडे करीत असताना त्यांना गोपनीय माहितीद्वारे वरील दोघांनी या म्हशी चोरल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्या दोघांना अटक करून न्यायालयात मंगळवारी उभे केले असता २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, मंगळवेढा तालुक्यात अनेक म्हशी चोरीला गेल्या असून, या सराईत चोरट्यांकडून अन्य म्हशीच्या चोऱ्या उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. यापूर्वीही या दोघांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनावरे चोरून ती विक्रीस नेली होती. या प्रकरणी मंद्रूप पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.