११ जणांच्या मारहाणीत दोन भाऊ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:54 IST2021-01-13T04:54:45+5:302021-01-13T04:54:45+5:30

सांगोला-एखतपूर रोड येथील किरण विठ्ठल जाधव यांचा चुलत भाऊ अनिल जाधव यांचे पैगंबर मुलाणी यांच्यात सोमवारी दुपारी भांडण झाले ...

Two brothers injured in 11-person attack | ११ जणांच्या मारहाणीत दोन भाऊ जखमी

११ जणांच्या मारहाणीत दोन भाऊ जखमी

सांगोला-एखतपूर रोड येथील किरण विठ्ठल जाधव यांचा चुलत भाऊ अनिल जाधव यांचे पैगंबर मुलाणी यांच्यात सोमवारी दुपारी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन रात्री ८ च्या सुमारास किरण जाधव व चुलत भाऊ अनिल जाधव हे बायपास रस्त्याने घरी येत होते. पैगंबर मुलाणी, दुर्गा चव्हाण, राजू लक्ष्मण निंबाळकर, देवाप्पा चव्हाण, काल्या चव्हाण, विष्णू निंबाळकर, धर्मा चव्हाण, विकास चव्हाण, पंज्या निंबाळकर, सुखदेव निंबाळकर, संजू चव्हाण (रा. संजयनगर झोपडपट्टी, सांगोला) यांनी, तू आमच्या गड्याला दुपारी का मारलेस, असा जाब विचारून पैगंबर मुलाणी याने काठीने किरण जाधव याच्या डाव्या हातावर मारहाण करून दात पाडला, तर दुर्गा चव्हाण हा चुलत भाऊ अनिल जाधव यास काठीने मारहाण करू लागल्याने वडील विठ्ठल जाधव हे भांडण सोडविण्यासाठी आले असता, राजू लक्ष्मण निंबाळकर, देवाप्पा चव्हाण, काल्या चव्हाण, विष्णू निंबाळकर, धर्मा चव्हाण, विकास चव्हाण, पंज्या निंबाळकर, सुखदेव निंबाळकर, संजू चव्हाण यांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. याप्रकरणी किरण विठ्ठल जाधव यांनी फिर्याद दाखल केली. यावरून पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two brothers injured in 11-person attack