शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार ; कुंभारीजवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 10:12 IST

कुंभारी रोडवरील घटना : ग्रामस्थांवर शोककळा

ठळक मुद्दे वळसंग पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल संदीप वाले याच्या अपघाती निधनाने गावकºयांवर शोककळा पसरलीसंदीपला मुलगी बघण्याचे काम सुरू होते

सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून कुंभारी गावाकडे जात असताना समोरून येणाºया आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत दोघे ठार झाले. हा अपघात दुपारी ३.३0 वाजता घडला. 

संदीप ईरण्णा वाले (वय २४, रा. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर), सर्फराज इक्बालपाशा पटेल (वय ४५, रा. सिद्धेश्वर साखर कारखाना कॉलनी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. संदीप वाले याचे वडील हे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात कामाला आहेत. कारखान्याकडून संदीप वाले हा मोटरसायकल (क्र.एम.एच.-३७३९) वरून सर्फराज पटेल यांना घेऊन कुंभारीकडे जात होता. तो कुंभारी रोडवरील गौरीशंकर ढाब्याच्या पुढे आला असता समोरून येणाºया आयशर टेम्पो (क्र.एम.एच.-१३ सीओ-४४0१) ने जोरात धडक दिली. धडकेत संदीप वाले हा गंभीर जखमी होऊन जागेवरच ठार झाला.

पाठीमागे बसलेल्या सर्फराज पटेल यांना उपचारासाठी कुंभारी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सर्फराज पटेल याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.  तपास पोलीस हवालदार ढवळे करीत आहेत. 

लग्नाची तयारी...- संदीप ईरण्णा वाले हा ड्रायव्हर असून तो मालट्रक चालवत होता, अत्यंत गरिबीतून आलेल्या या कुटुंबात संदीपचे वडील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात कामाला आहेत. मोठा भाऊ सोमशंकर हा देखील साखर कारखान्यातच कामाला आहे. दोन नंबर भाऊ सिद्धाराम हा बीएसएफमध्ये जवान आहे. मोठ्या भावाचे लग्न झाले असून आता राहिलेल्या दोन मुलांची लग्ने करण्याची तयारी ईरण्णा वाले करीत होते. दोन नंबरच्या भावाला मुलगी ठरवण्यात आली असून संदीपला मुलगी बघण्याचे काम सुरू होते. अशा परिस्थितीत अचानक संदीप वाले याच्या अपघाती निधनाने गावकºयांवर शोककळा पसरली आहे.  

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातDeathमृत्यूSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस