तांत्रिक दोष निघाला, सिद्धेश्वरला ६ तास उशीर, पण दुर्घटना टळली
By रूपेश हेळवे | Updated: October 11, 2023 15:48 IST2023-10-11T15:38:03+5:302023-10-11T15:48:28+5:30
ऐनवेळी दोष आढळल्याने तो दोष दूर करण्यासाठी पाठवण्यात आले. यामुळे ही गाडी मुंबईहून सोलापूर कडे येण्यास उशीर झाली.

तांत्रिक दोष निघाला, सिद्धेश्वरला ६ तास उशीर, पण दुर्घटना टळली
सोलापूर : मुंबईहून सोलापूर कडे येणार्या सिध्देश्वर एक्सप्रेसच्या दोन बाेगीमध्ये मंगळवारी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ही गाडी बुधवारी जवळपास सहा तास उशीरा सोलापूर स्थानकात पोहचली. यामुळे प्रवाशांची मोठी दैना उडाली.
मंगळवारी सायंकाळी १० च्या सुमारास निघणार्या सिध्देश्वर एक्सप्रेसच्या डब्यामध्ये निघण्याच्या पूर्वी तांत्रिक दोष आढळला. ऐनवेळी दोष आढळल्याने तो दोष दूर करण्यासाठी पाठवण्यात आले. यामुळे ही गाडी मुंबईहून सोलापूर कडे येण्यास उशीर झाली. साधारणता रात्री १० च्या सुमारास निघणार्या गाडीला जवळपास २ वाजता ही गाडी सोलापूरच्या दिशेने धावली. नेहमी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोलापूर स्थानकात पोहचणारी सिध्देश्वर एक्सप्रेस तब्बल सहा तास उशीरा आली. ही गाडी बारा वाजण्याच्या सुमारास सोलापूर स्थानकात दाखल झाली. यामुळे प्रवाशांचे पुढील नियोजन पूर्ण: कोलमडले.