शहरं
Join us  
Trending Stories
1
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
2
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
3
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
4
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
5
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
6
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
7
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
8
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
9
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
10
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
11
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
12
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
13
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
14
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
15
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
16
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
17
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
18
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
19
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
20
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

टाटा, कोयनाचे पाणी सोलापूरकडे वळवा; सर्वपक्षीय गटनेत्यांचा महापालिकेच्या सभेसमोर प्रस्ताव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 14:29 IST

सोलापूर : राज्य शासनाने टाटांच्या ताब्यात असलेली धरणे आणि सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वळविण्यास मंजुरी द्यावी, ...

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वळविण्यास मंजुरी द्यावीकिसान आर्मीचे प्रमुख प्रफुल्ल कदम गेल्या काही वर्षांपासून टाटांच्या ताब्यातील धरणांचे पाणी सोलापूर जिल्ह्यात वळवावे यासाठी पाठपुरावामहापालिका सभेच्या पुरवणी प्रस्तावात सर्वपक्षीय गटनेत्यांनी शासनाला विनंती करणारा प्रस्ताव मांडला

सोलापूर : राज्य शासनाने टाटांच्या ताब्यात असलेली धरणे आणि सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वळविण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव सर्वपक्षीय गटनेत्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे.

महापालिकेची सर्वसाधारण सभा २८ जानेवारी रोजी होणार आहे. किसान आर्मीचे प्रमुख प्रफुल्ल कदम गेल्या काही वर्षांपासून टाटांच्या ताब्यातील धरणांचे पाणी सोलापूर जिल्ह्यात वळवावे यासाठी पाठपुरावा करीत आहेत. या चळवळीला पाठबळ देण्यासाठी महापालिका सभेच्या पुरवणी प्रस्तावात सर्वपक्षीय गटनेत्यांनी शासनाला विनंती करणारा प्रस्ताव मांडला आहे.

यात म्हटले आहे, टाटा कंपनीने लोणावळा, वळवण, शिरवटा, सोमवडी, ठोकरवाडी, मुळशी या सहा धरणांमध्ये कृष्णा खोºयातील तुटीच्या खोºयातील ४८.९७ टीएमसी पाणी अडविले आहे. या पाण्यावर ते भिरा, भिवपुरी, खोपोली या ठिकाणी वीजनिर्मिती करुन मुंबई शहराला वीज विक्री करीत आहेत. टाटा कंपनीचा पाणी व्यवहार राज्याच्या जलनितीच्या धोरणाप्रमाणे नाही. जलकायद्याच्या विद्युत कायद्याच्या, पर्यावरणाच्या आणि विशेष म्हणजे राज्य घटनेच्या कलम ३८ व ३९ च्या तरतुदीप्रमाणे नाही. वीजनिर्मितीला इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सोलापूर शहर हे सतत दुष्काळी, तुटीच्या खोºयात आहे. त्याचाही विचार व्हावा.

उजनीचे पाणी अस्वच्छ म्हणून...- सोलापूरला उजनी धरणातून पिण्याचे पाणी मिळत आहे. उजनीतील पाणी अत्यंत धोकादायक आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. टाटांच्या ताब्यातील धरणांचे पाणी स्वच्छ व चांगले आहे. उजनी धरणातील पाण्यासाठी दुहेरी पाईपलाईनची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. टाटा व कोयना धरणातील पाणी सोलापूर शहरासाठी मंजूर झाल्यास पाणी उताराने आणणे शक्य होणार आहे. सध्या पंपिंगद्वारे पाणी उचलण्याचा विजेचा मोठा खर्च वाचणार आहे. नैसर्गिक हक्काचे पाणी सोलापूर शहराला मिळावे अशी मागणी आम्ही करीत आहोत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाTataटाटाUjine Damउजनी धरण