ट्रकच्या धडकेत पादचारी ठार

By Admin | Updated: August 23, 2014 00:47 IST2014-08-23T00:47:36+5:302014-08-23T00:47:36+5:30

ट्रकची जोरदार धडक

Truckers killed in trucks | ट्रकच्या धडकेत पादचारी ठार

ट्रकच्या धडकेत पादचारी ठार


सोलापूर : वेगाने निघालेल्या ट्रकची जोरदार धडक दिल्याने पादचारी जागीच मरण पावल्याची घटना गुरुवारी रात्री ८ वाजता घडली. उमेश दिलीप वाघ (वय-२४, रा. गणेश नगर, नवीन तुळजापूर नाका, सोलापूर) असे मरण पावलेल्याचे नाव आहे.
दिलीप हा तुळजापूर नाका येथील चव्हाण फर्निचर दुकानाजवळील रस्ता ओलांड होता. त्याचवेळी ट्रकने (क्रमांक- एमएच-२५/बी-९९२५) त्यास धडक दिली. तो जागीच ठार झाला. याप्रकरणी प्रशांत विजयकुमार रेड्डी (वय-३४, रा. श्रीधर नगर, तळेहिप्परगा, ता. उत्तर सोलापूर) याने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, ट्रकचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि भुसनूर करीत आहेत.

Web Title: Truckers killed in trucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.