आप्पासाहेब पाटील, सोलापूर: सोलापूर शहर परिसरात असलेल्या बाळे उड्डाणपुलावर कांदा घेऊन जाणारा ट्रक अचानक पलटी झाला. या अपघातानंतर सोलापूर हैदराबाद पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणपणे पाच ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसल्या.
दरम्यान, जुना पुना नाका पुलावर उलटलेली कांद्याची वाहतूक करणारी ट्रक क्रेन च्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम सुरू आहे, परंतु तुळजापूरमहामार्गांकडून येणाऱ्या रस्त्यावर वाहनांची मोठी रांग लागलेली आहे. त्याचबरोबर आज जेईई ऍडव्हान्स ची परीक्षा असल्याने या अपघाताचा काही विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी सोलापूर शहर दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.