मालट्रकने उसाच्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने ट्रॉली पलटी; महामार्गावरील वाहतूक झाली विस्कळीत
By Appasaheb.patil | Updated: February 9, 2023 23:01 IST2023-02-09T23:00:27+5:302023-02-09T23:01:06+5:30
तब्बल दीड तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. यापूर्वी बाळ्यामधून सदरची वाहतूक ही सर्विस रोड वरून वळवण्यात आल्यामुळे अनेक वाहनांना मार्ग मोकळा झाला होता.

मालट्रकने उसाच्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने ट्रॉली पलटी; महामार्गावरील वाहतूक झाली विस्कळीत
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील शेतकरी धर्मा तात्या वाघमारे यांच्या शेतातील ऊस भरून सिद्धेश्वर कारखान्याकडे सोलापूरच्या दिशेने येत असलेल्या परला ट्रॅक्टरला एम एच.१३.डी वाय ६५४७ (केए. 56- 19 99 ) या ट्रकने ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्यामुळे दोन्ही ट्रॉल्या रस्त्यावरती पलटी झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती.
अपघाताचे वृत्त कळताच शहर वाहतूक शाखेचे पी.एस.आय.प्रवीण पारडे, फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे बीट मार्शल, पोलीस कॉन्स्टेबल विश्वनाथ कांबळे. रणजीत चांडोले, पोलीस हवालदार सकिब काझी, आदींनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
तब्बल दीड तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. यापूर्वी बाळ्यामधून सदरची वाहतूक ही सर्विस रोड वरून वळवण्यात आल्यामुळे अनेक वाहनांना मार्ग मोकळा झाला होता. सदर अपघाताबाबत पदार्थवली पोलीस स्टेशनला नोंद झाली असून अधिक तपास पीएसआय पारडे हे करत आहेत.