शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवेढाजवळ अपघात; महाविद्यालयीन युवक ठार, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 12:43 IST

मंगळवेढा : लोकमत न्युज नेटवर्क मंगळवेढा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दामाजी महाविद्यालयासमोर सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या ...

ठळक मुद्देट्रक चालकाविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलअपघातातील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखलअपघातस्थळी पोलीस दाखल, पंचनामा करण्याचे काम सुरू

मंगळवेढा : लोकमत न्युज नेटवर्कमंगळवेढा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दामाजी महाविद्यालयासमोर सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. या धडकेत  महाविद्यालयात शिकणारा तरुण जागीच ठार झाला असून हा अपघात रात्री बाराच्या सुमारास घडला. राहुल शिवाजी कसगावडे (वय १८) असे या तरुणाचे नाव आहे. तर अमोल लक्ष्मण शिंदे (वय १८) व अशोक सीताराम सावंजी (वय १८) हे दोघे जखमी झाले आहेत.

मालट्रक (एम. एच. 13 सी एक्स 1670)  सोलापूरच्या दिशेने जात होता. हा मालट्रक महाविद्यालयाजवळ आला असताना दुचाकीवर मंगळवेढाकडे येत असलेल्या राहुल कसगावडे व अशोक सावंजी यांना ट्रकचालकाने समोरून धडक दिली. समोरुनच जोरदार धडक दिल्याने ट्रकमध्ये दुचाकी अडकली आणि ४०० मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली.  तसेच पायी चालत येणाऱ्या अमोल शिंदे याला देखील ट्रकने जोराची धडक दिली. 

या अपघातात राहुल कसगावडे जागीच ठार झाला तर जखमी सावंजी व शिंदे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक चालकाविरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस