शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

सोलापुरातील परिवहन कर्मचाºयांचा संप कायम, पगारासोबतच आता व्यवस्थापकांना हटविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 11:04 AM

सोलापूर : दोन महिन्यांचा थकीत पगार मिळावा, या मागणीसाठी महापालिका परिवहन उपक्रमाच्या कर्मचाºयांनी मंगळवारपासून सुरू केलेला संप दुसºया दिवशीही ...

ठळक मुद्देतिढा कायम: शिवसेना व्यवस्थापनाच्या पाठीशी पण, आयुक्तांच्या विरोधात

सोलापूर : दोन महिन्यांचा थकीत पगार मिळावा, या मागणीसाठी महापालिका परिवहन उपक्रमाच्या कर्मचाºयांनी मंगळवारपासून सुरू केलेला संप दुसºया दिवशीही कायम होता. कर्मचाºयांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हा संप झाल्याचा दावा परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी केला आहे. ६० हून अधिक कर्मचाºयांनी मल्लाव यांना हटविण्याची मागणी केली आहे. 

परिवहन कर्मचाºयांना दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यांनी पुकारलेल्या संपामुळे सात रस्ता आणि राजेंद्र चौक येथील डेपोमध्ये बस थांबून आहेत. ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. त्यांना खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने अंध, अपंग आणि मूकबधिर यांच्या मोफत प्रवास पासचे ८३ लाख रुपयांचे बिल दिल्यास कर्मचाºयांचे वेतन करता येईल, असे परिवहन व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के आणि सदस्यांनी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली होती. परंतु, आयुक्तांनी आर्थिक अडचणीमुळे हे बिल देता येणार नाही, असे सांगितले आहे.  

व्यवस्थापनाकडून दिशाभूल, कामगारांचा आरोप- परिवहन उपक्रमाचे देविदास गायकवाड, आर. एम. मकानदार, दस्तगीर कोरके, नागेश म्हेत्रे, सुधाकर मारडकर, एम. एस. कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. ६२ कामगारांच्या सह्या असलेले एक निवेदन जारी केले. यात म्हटले आहे की, परिवहन कर्मचाºयांच्या वेतनाबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा, सर्व कामगारांना महापालिकेत वर्ग करावे. जुलै २०१७ ते जुलै २०१८ पर्यंतचे वेतन थकले आहे. याचा पाठपुरावा करून सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळावे. परिवहन व्यवस्थापक १० जुलै रोजी रुजू झाले. त्यांच्या कार्यकाळात एकूण भंगार विकून केवळ दोन वेळा वेतन दिले. व्यवस्थापक अशोक मल्लाव सक्षम नाहीत. ते कामगार आणि जनतेची दिशाभूल करीत आहेत. महापालिकेचे आरोग्य खाते, उद्यान, शिक्षण खात्यातून काहीच उत्पन्न मिळत नाही. पण तरीही ते चालविले जाते. बेस्टच्या धर्तीवर सोलापूर परिवहनचे महापालिकेत विलीनीकरण करावे. 

सात रस्ता पंप बंद, घंटागाड्या पोलिसांच्या पंपावर- कर्मचाºयांनी सात रस्ता डेपोमधील डिझेल पंप बंद ठेवला आहे. त्यामुळे घंटागाड्या आणि पदाधिकाºयांच्या गाड्यांना ग्रामीण पोलीस दलाच्या पंपावरून इंधन भरण्यास सुरुवात केली आहे. कामगारांनी हा पंप सुरू ठेवायला हवा होता. तो बंद ठेवल्यामुळे मनपा आयुक्त संतापले. कामगारांनी अत्यावश्यक सेवेला बाधा आणली, असेही मल्लाव यांनी सांगितले. 

ही तर भाजपची चाल, आम्ही आंदोलनात  उतरू : तुकाराम मस्के 

  • - परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के म्हणाले, भाजपच्या नेत्यांनी अर्थसंकल्पात परिवहनसाठी दरवर्षीप्रमाणे तरतूद करणे अपेक्षित होते. परंतु, ही समिती शिवसेनेला मिळाली, त्यामुळे भाजपवाल्यांनी ही   तरतूदच केली नाही. शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपने खेळलेली ही चाल आहे.
  • - महापालिका आयुक्त डॉ. ढाकणे  हे सुद्धा थकीत बिल देण्यास वेळ लावत आहेत. त्यात कामगारांचे हाल होत आहेत. परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांचे काम चांगले आहे. मल्लाव आणि आमच्या पुढाकारामुळे   सध्या ४५ बस रस्त्यावरुन धावत आहेत.
  • - शिवसेनेचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक यांची गुरुवारी सायंकाळी ४ वा. महापालिकेत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीनंतर शिवसेना कामगारांच्या आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेणार आहे. 
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका