शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

आता ट्रान्सपोर्टला आरटीओची नोंदणी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 17:14 IST

कॅरेज बाय रोड अधिनियम २00७ च्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने २८ फेब्रुवारी रोजी नियम २0११ अन्वये अधिसूचना जारी केली आहे.

ठळक मुद्देप्रवासी वाहनांना जीपीआरएस (लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस) व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारकमोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशारा

सोलापूर: माल वाहतूक व्यवसायातील वाहतूकदार, ठेकेदार, बुकिंग एजंट, दलाल, वाहतूक कंपनी, कागदपत्रे, पाकिटे, मालाची पोहोच करणाºया कुरिअर कंपनीला आता व्यवसाय करण्यासाठी आरटीओकडे नोंदणी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

प्रत्येक शहरात बाजारपेठ, मार्केट यार्डमध्ये मालाची ने-आण करण्यासाठी अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्या कार्यरत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून या कंपन्या कमिशनवर कार्यरत आहेत. त्याचबरोबर बसस्थानक व स्टेशन परिसरात ट्रॅव्हल्सचे तिकीट बुकिंग करणारे दलाल, एजंट व कंपनीची कार्यालये थाटली गेली आहेत. या सर्व व्यवहारांची नोंद आतापर्यंत होत नव्हती. ज्याप्रमाणे रिक्षा व ट्रॅव्हल्सच्या भाड्यावर आरटीओचे नियंत्रण असते त्याप्रमाणे मालवाहतूक करणाºया वाहनांवर कोणतेही निर्बंध नाहीत. पण आता केंद्र शासनाने यापूर्वी संमत झालेला कायदा अंमलात आणला आहे. 

कॅरेज बाय रोड अधिनियम २00७ च्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने २८ फेब्रुवारी रोजी नियम २0११ अन्वये अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून हा नियम लागू झाला आहे.

मालाची साठवणूक करणारे, वितरक, माल जमा करणारे, व्यावसायिक यांना कॉमन कॅरिअर म्हणून क्षेत्रीय नोंदणी प्राधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे अर्ज करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्ट चालक, मालक, दलाल, एजंट व कुरिअर कंपन्यांनी तातडीने आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून ३१ मेच्या आत नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशारा परिवहन आयुक्तांनी दिला आहे.

सार्वजनिक बसला जीपीएसच्केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियमात सुधारणा करून नियम १२५ (एच) प्रमाणे १ एप्रिलनंतर बाजारात येणाºया सार्वजनिक वाहतूक करणाºया प्रवासी वाहनांना जीपीआरएस (लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस) व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक केले आहे. याबाबत वाढीव मुदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता नव्याने बाजारात येणाºया बसना हा नियम लागू होणार आहे.

केंद्र शासनाच्या कॅरेज बाय रोड अ‍ॅक्ट २00७ व कॅरेज बाय रोड नियम २0११ अंतर्गत शहरातील ट्रान्सपोर्ट चालक, मालक व कुरिअर कंपनीच्या चालकांनी आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे. तसे आदेश परिवहन आयुक्तांकडून आले आहेत. या नियमाची अंमलबजावणी सुरू आहे. - बजरंग खरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीसTransferबदली