मंगळवेढा प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांची बदली; नवे प्रांताधिकारी बी. आर माळी 

By Appasaheb.patil | Updated: August 7, 2023 19:02 IST2023-08-07T19:02:51+5:302023-08-07T19:02:58+5:30

मल्लिकार्जुन देशमुखे मंगळवेढा प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी बी आर माळी यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Transfer of Mangalvedha District Magistrate Appasaheb Saminder New Provincial Officer B. R gardener | मंगळवेढा प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांची बदली; नवे प्रांताधिकारी बी. आर माळी 

मंगळवेढा प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांची बदली; नवे प्रांताधिकारी बी. आर माळी 

मंगळवेढा : मल्लिकार्जुन देशमुखे मंगळवेढा प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी बी आर माळी यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचा आदेश महसुल विभाग मंत्रालयाकडून काढण्यात आला आहे. यापूर्वी बी आर माळी यांनी २००८ ते २०११ पर्यत  मंगळवेढा तहसीलदारपदाचा कार्यभार उत्तमपणे सांभाळला आहे. 

त्यानंतर चंदगड, मोहोळ येथे कामकाज केले आहे त्यांची २०१८ साली उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती झाली त्यानतर २०१९ ते २०२३ पर्यत पन्हाळा प्रांताधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे.सध्या ते सांगली येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी पदी कार्यरत होते. मंगळवेढा प्रांताधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आप्पासाहेब समीनदर यांची बदली प्रस्तावित असून त्यांच्या बदलाने रिक्त होणाऱ्या या पदावर बी आर माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दोन दिवसात पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Transfer of Mangalvedha District Magistrate Appasaheb Saminder New Provincial Officer B. R gardener