पंतप्रधान मोदींच्या दौरा मार्गावरील वाहतूक २४ तासासाठी बंद; पर्यायी मार्गाचे नियोजन

By विलास जळकोटकर | Updated: January 18, 2024 18:13 IST2024-01-18T18:13:24+5:302024-01-18T18:13:38+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (१९ जानेवारी २०२४) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत रे नगर कुंभारी येथील कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण होणार आहे.

Traffic on PM Modi's tour route closed for 24 hours; Alternative route planning | पंतप्रधान मोदींच्या दौरा मार्गावरील वाहतूक २४ तासासाठी बंद; पर्यायी मार्गाचे नियोजन

पंतप्रधान मोदींच्या दौरा मार्गावरील वाहतूक २४ तासासाठी बंद; पर्यायी मार्गाचे नियोजन

विलास जळकोटकर / सोलापूर

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (१९ जानेवारी २०२४) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत रे नगर कुंभारी येथील कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण होणार आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सोलापूर ते हैदराबाद रोडवरील दोड्डी फाटा ते कुंभारी या मार्गावरील वाहतूक दिवसभरासाठी बंद राहणार आहे. अत्यावश्यक वाहनांना यातून वगळण्यात आले आहे. 

पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी आदेश बजावला असून, दोड्डी फाटा - दोड्डी चौक - रे नगर - कुंभारी यादरम्यान वाहतुकीसाठी मनाई करण्यात आली आहे. याऐवजी या मार्गावरील वाहने तांदूळवाडी - मुस्ती - धोत्री, वडगाव, दिंडूर, वळसंगमार्गे पथक्रमण करतील. तसेच वळसंग - दिंडूर - वडगाव धोत्री, मुस्ती तांदूळवाडीमार्गे ये-जा करतील, असे नमूद केले आहे. 

कार्यक्रमास कसे जाल..

सोलापूर ते अक्कलकोट रोडवरील बंदपट्टे वीटभट्टी ते रे नगर रस्ता, आण्णा मोटार्स ते रे नगर जाणारा रस्ता, टोल नाका ते रे नगर जाणारा रस्ता या मार्गे नागिरकांना सभेच्या ठिकाणी जाता येणार आहे. तसेच सोलापूर हैदराबाद रोडवरील मुळेगाव, दोड्डी फाटा, दोड्डी चौक, धोत्रीमार्गे पोहोचता येणार आहे.

Web Title: Traffic on PM Modi's tour route closed for 24 hours; Alternative route planning