कॅनॉलच्या खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, तरूण बांधकाम मिस्त्रीचा दुदैवी मृत्यू
By दिपक दुपारगुडे | Updated: April 16, 2023 16:19 IST2023-04-16T16:18:17+5:302023-04-16T16:19:18+5:30
गंभीर जखमी लक्ष्मण यास मित्रानी शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

कॅनॉलच्या खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, तरूण बांधकाम मिस्त्रीचा दुदैवी मृत्यू
वडाळा : कॅनॉलच्या खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी झाल्याने बांधकाम करणार्या मिस्त्रीचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वडाळा (ता. उ. सोलापूर) येथे घडली. लक्ष्मण (अबु) भुजंग देवकर (वय ३५) असे मयत तरूणाचे नाव आहे.
दरम्यान, रविवार १६ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे गावापासून थोड्याच अंतरावरील उजनी कॅनाॅलच्या उप फाटयाच्या खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी झाला. त्यानंतर गंभीर जखमी लक्ष्मण यास मित्रानी शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मयत लक्ष्मण देवकर हे बांधकाम मिस्त्री व्यवसायिक असून ते कधीकधी शेतकऱ्याच्या शेतात मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर भाड्याने जाऊन घर प्रपंच चालवित होते. त्यांच्या घराच्या थोडयाच अंतरावर उजनी कॅनॉलचा फाट गेलेला आहे. कॅनॉलच्या कडेला असलेल्या रस्त्यावरुन शेतकऱ्याच्या शेतात मशागतीसाठी ट्रॅक्टर घेऊन जात असताना कॅनाँलच्या उपफाटयासाठी अंडरग्राउंड पाईपलाईन करण्यात आलेली आहे. परंतु मुख्य कॅनॉलमधून उपफाटयांना पाणी सोडण्यासाठी जे चेंबर बांधण्यासाठी सोडलेला खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन त्यांचा अपघात झाला.