ट्रॅक्टर पलटी होऊन चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:21 IST2020-12-22T04:21:20+5:302020-12-22T04:21:20+5:30

करमाळा : जामखेड - करमाळा रस्त्यावर पोथरे येथे उसाचा रिकामा ट्रॅक्टर ट्राॅलीसह पलटी होऊन चालक ठार झाला. राजेंद्र उत्तम ...

The tractor overturned and killed the driver | ट्रॅक्टर पलटी होऊन चालक ठार

ट्रॅक्टर पलटी होऊन चालक ठार

करमाळा : जामखेड - करमाळा रस्त्यावर पोथरे येथे उसाचा रिकामा ट्रॅक्टर ट्राॅलीसह पलटी होऊन चालक ठार झाला.

राजेंद्र उत्तम पवार (वय ४६, रा. पोफळज, ता. करमाळा) असे मरण पावलेल्या ट्रॅक्टरचालकाचे नाव असून,

सोमवारी (दि. २१) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पोथरे येथील पेट्रोलपंपाजवळ हा अपघात झाला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र पवार हे हाळगाव येथील साखर कारखान्याला ऊस देऊन रिकाम्या ट्रॉल्या घेऊन करमाळाकडे भरधाव वेगात निघाले होते. दरम्यान, नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला. या ट्रॅक्टरखाली सापडून चालक पवार जागीच मरण पावले. पवार हे पोफळजचे माजी सरपंच मारुती उत्तम पवार यांचे बंधू आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील व भाऊ असा परिवार आहे.

या घटनेची करमाळा पोलिसात नोंद झाली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.

---

फोटो: २१ राजेंद्र पवार

Web Title: The tractor overturned and killed the driver