‘आयकॉन्स आॅफ सोलापूर’ पुस्तकाचे आज प्रकाशन
By Admin | Updated: September 4, 2014 01:17 IST2014-09-04T01:17:53+5:302014-09-04T01:17:53+5:30
सोलापूर जिल्ह्यातील कर्तृत्ववानांवर प्रकाशझोत

‘आयकॉन्स आॅफ सोलापूर’ पुस्तकाचे आज प्रकाशन
सोलापूर : लोकमत सोलापूर आवृत्तीच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘आयकॉन्स आॅफ सोलापूर’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवार दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता होटगी रोडवरील हॉटेल बालाजी सरोवर प्रिमियम येथे एका दिमाखदार सोहळ्यात करण्यात येणार आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते आणि लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन व लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ खा. विजय दर्डा, लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर, प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या विशेष उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा होणार आहे.
बातमीदारीबरोबरच जनसंपर्कातही आघाडीवर असणाऱ्या लोकमतने ‘आयकॉन्स् आॅफ सोलापूर’च्या माध्यमातून कॉफी टेबल बुक वाचकांसमोर आणले आहे. या पुस्तकामध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील विशेष कामगिरी केलेल्या ५१ नामवंतांचा समावेश आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हा विशेष निमंत्रितांसाठी असून या पुस्तकाला युनिटी मल्टिकॉनचे कफील मौलवी हे मुख्य प्रायोजक तर स्वप्नील डेव्हलपर्सचे अमोल सोनकवडे हे सहप्रायोजक आहेत.
----------------------
कर्तृत्ववान कार्याची ओळख करुन देण्यासाठी ‘लोकमत’ च्या वतीने ‘आयकॉन्स’ या ‘कॉफी टेबल बुक’च्या मालिकेस सुरुवात करण्यात आली आहे. पुणे, औरंगाबाद, ठाणे, नाशिक येथील आयकॉन्स बुकला सर्व क्षेत्रातून मिळालेल्या प्रतिसादानंतर सोलापुरातील विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्यांचा समावेश असणाऱ्या ‘आयकॉन्स आॅफ सोलापूर’ या पुस्तकाचे गुरुवारी प्रकाशन होत आहे.