शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडणार, मुंबईत बैठक : बबनराव शिंदे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 17:14 IST

शेतीसाठी आज गुरुवारपासून उजनी धरणाचे पाणी कालव्यातून सोडण्याचा निर्णय मुंबईत बुधवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. या निर्णयामुळे रब्बी पिकांना पाणी मिळणार असल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. 

ठळक मुद्दे उजनी कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू करण्याचे आदेशरब्बी हंगामासाठी १५ नोव्हेंबर २०१७ पासून कालव्यात सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आलेसोलापूर, पंढरपूर आदी शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १३ किंवा १४ जानेवारी २०१८ पासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी

आॅनलाइन लोकमत सोलापूरटेंभुर्णी दि ११ : शेतीसाठी आज गुरुवारपासून उजनी धरणाचे पाणी कालव्यातून सोडण्याचा निर्णय मुंबईत बुधवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. या निर्णयामुळे रब्बी पिकांना पाणी मिळणार असल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. आ. शिंदे म्हणाले, २०१७ च्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झालेला असल्यामुळे आॅक्टोंबर महिन्यात उजनी धरणात १११ टक्के पाणीसाठा झाला होता. सर्वत्र पाण्याची मुबलकता असल्यामुळे चालू वर्षाच्या रब्बी हंगामासाठी १५ नोव्हेंबर २०१७ पासून कालव्यात सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन एक महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आलेले होते. सध्या उजनी धरणात १०४ टक्के पाणीसाठा असून, उजनीच्या मुख्य कालवा २० किमी, उजवा कालवा ११९ किमी व डावा कालवा १२६ कि.मी.पर्यंतच्या लाभक्षेत्रातील पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता निर्माण झालेली होती. या आवर्तनाची १५ डिसेंबर २०१७ पासूनच शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते.मुंबईत कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवार, दिनांक ११ जानेवारी २०१८ रोजी सकाळी उजनी कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू करण्याचे आदेश दिले.   बबनराव शिंदे यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती.  सीना-माढा उपसा सिंचन सुरू करण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. या योजनेचे थकीत वीज बिल भरल्याशिवाय योजना सुरू करता येणार नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले. सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे २ कोटी ६ लाख रुपये वीज बिल थकीत असून, शासनाने ४८ लाख ५६ हजार रुपयांचा एक हप्ता भरल्याशिवाय योजना चालू करू नये, असा आदेश दिला आहे. त्यामुळे योजना सुरू राहण्याच्या दृष्टीने योजनेवरील लाभधारक शेतकºयांनी वीज बिल भरण्यासाठी सहकार्य करावे, असे बबनराव शिंदे यांनी सांगितले.बैठकीस पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आ. बबनदादा शिंदे, आ. भारत भालके, जलसंपदाचे प्रमुख अधिकारी रजपूत, सोलापूरचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले, उपजिल्हाधिकारी शिंदे आदी उपस्थित होते.-----------------------सोलापूर, पंढरपूरचाही निर्णय- सोलापूर, पंढरपूर आदी शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १३ किंवा १४ जानेवारी २०१८ पासून उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याचेही आदेश महाजन यांनी दिले.

टॅग्स :SolapurसोलापूरMumbaiमुंबई