शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

‘तीर्थ विठ्ठल’ विशेषांकाचे चंद्रभागा पात्रात प्रकाशन

By admin | Updated: July 10, 2014 01:32 IST

‘लोकमत’चा अभिनव प्रकाशन सोहळा : चंद्रभागा प्रदूषणमुक्तीची हाक

पंढरपूर: ‘माझी चंद्रभागा, राखू तिची निगा...!’ पवित्र चंद्रभागा नदीच्या प्रदूषणमुक्तीचा असा संदेश देऊन ‘लोकमत’ने आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त काढलेल्या ‘तीर्थ विठ्ठल’ या विशेषांकाचे आज चंद्रभागेच्या पात्रात होडीमध्ये अभिनव पद्धतीने प्रकाशन करण्यात आले. विदर्भ, खान्देश, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रातिनिधिक वारकऱ्यांच्या हस्ते हा अनुपम सोहळा झाला.‘तीर्थ विठ्ठल’चे प्रकाशन करण्यासाठी एकनाथ चिंतामण पाटील (रा. चिंचोली, ता. यावल, जि. जळगाव), गणपती हरिभाऊ पुरी (रा. पैठण, जि. औरंगाबाद), नरेंद्र बाबुराव जाधव (रा. धुळे), हणुमंत नामदेव पवार (रा. लातूर) आणि भागवत पवार (रा. जामखेड, जि. नगर) या वारकऱ्यांना निमंत्रित करण्यात आले. एका होडीमध्ये या वारकऱ्यांना आसनस्थ करून चंद्रभागेच्या पवित्र पात्रात या वारकऱ्यांच्या हस्ते अंकाचे लोकार्पण झाले. चंद्रभागेच्या तीरावर ‘लोकमत’ या अभिनव उपक्रमाबद्दल कमालीची उत्सुकता होती. हा सोहळा अनुभवण्यासाठी चंद्रभागा स्नानासाठी आलेले वारकरी खास थांबलेले होते. शेजारीच असलेल्या इस्कॉनच्या मंदिरातील भाविकांनीही ‘लोकमत’च्या या आगळ्या सोहळ्यास उपस्थिती लावली. चंद्रभागा नदीच्या प्रदूषणासाठी ‘लोकमत’ने जनतेला दिलेल्या संदेशाची आणि जनजागरण चळवळीची प्रशंसा केली. वाल्मिकी संघटनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी आपल्या होड्या देऊन या उपक्रमात सहभाग घेतला.‘लोकमत’चे संपादक राजा माने, सहा. सरव्यवस्थापक रमेश तावडे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळ्यासाठी आलेल्या राज्यातील विविध विभागातील वारकरी आणि अंकुशराव यांचा सत्कार करण्यात आला