सावकाराच्या कर्जाच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

By दिपक दुपारगुडे | Updated: July 13, 2023 19:27 IST2023-07-13T19:26:50+5:302023-07-13T19:27:03+5:30

या प्रकरणी करमाळा पोलिसात नोंद झाली आहे.

tired of moneylender debt youth commit dead | सावकाराच्या कर्जाच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

सावकाराच्या कर्जाच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या

दीपक दुपारगुडे, सोलापूर : जेऊर येथील स्वप्निल शंकर कांबळे (वय ३०) या तरुणाने डोक्यावर वाढलेला कर्जाचा बोजा व सावकाराच्या तगाज्याला कंटाळून रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी करमाळा पोलिसात नोंद झाली आहे.

स्वप्निल कांबळे हा जेऊर गावात सर्वात मिसळून राहणारा तरूण असून आठवड्याभरापासून तो एकांतातच राहत होता मिळालेल्या माहितीनुसार त्याने अनेक खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते व काही जण पैशासाठी तगादा लावत असल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: tired of moneylender debt youth commit dead