पत्नीला कंटाळून बादोल्यात पतीने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:22 IST2021-09-13T04:22:05+5:302021-09-13T04:22:05+5:30
अक्कलकोट : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ सप्टेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता अक्कलकोट तालुक्यात बादोले ...

पत्नीला कंटाळून बादोल्यात पतीने घेतला गळफास
अक्कलकोट : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ६ सप्टेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता अक्कलकोट तालुक्यात बादोले बु. येथे घडली.
याबाबत सखुबाई महिपती सोलंकर (वय ५५, रा. बादोला बु. ता. अक्कलकोट) यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनेच्या त्रासाला कंटाळून मुलाने गळफास घेतल्याचे आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत ११ सप्टेंबरला सायंकाळी दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार चारित्र्याच्या संशयावरून मुलगा राम याचा पत्नीचा वाद झाला. त्यानंतर पत्नीकडून मानसिक त्रास होत राहिला. तिच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सखुबाई यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे करत आहेत.