शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

टायर, बांबू अन् दगडं रचण्यासाठी सरसावली गल्ली; ट्रॉली, फळ्या लावण्यात बोळही ठरला भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 10:36 IST

सोलापुरात प्रचंड भिती; आपापला परिसर बंद करण्यासाठी नागरिकांनी उभारले अडथळे  

ठळक मुद्दे- सोलापुरात कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू- शहरात ठिकठिकाणी भितीचे वातावरण- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घेतली खबरदारी

सोलापूर :  तेलंगी पाच्छा पेठेत आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे संपूर्ण शहरासह पूर्व भाग हादरून गेला आहे. परिसरातील लोक कोरोनाचे संक्रमण तोडण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेत आहेत़ मिळेत त्या वस्तू आढवे लावून आपली गल्ली, मोहल्ला बंद करतानाचे चित्र सोमवारी दिवसभर पहावयास मिळाले़ काही ठिकाणी तुम्ही तुमच्या घरी राहा, आम्ही आमच्या घरी राहतो असे संदेश लिहले होते.

सोलापुरात एकही कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह नाही या अविभार्वात बिनधास्तपणे भटकणाºया नागरिकांनी आज मात्र गल्ली बोळ बंद करून घरी राहणेच पसंद केले .जीवनावश्यक वस्तू वितरित करणारे दूध, भाजीपाला विक्रेत्यांना ही मज्जाव केले़ पोलिस सकाळपासूनच ध्वनिक्षेपकावरून घराबाहेर न पडण्याचे अवाहन करत होते .तेलंगी पाच्छा येथील ज्या ठिकाणी रुग्ण आढळुन आला त्या परिसरातील जोडबसवण्णा चौक, रविवार पेठ, दाजी पेठ, भद्रावती पेठ, न्यू पाच्छा पेठ, शांती चौक, मार्कडेय चौक, कुचन नगर, राहुल गांधी झोपडपट्टी, गिरी झोपडपट्टी, संयुक्त झोपडपट्टी या सर्व वस्तीतील गल्ली बोळ मिळेल त्या साहित्यांनी बंद करण्यात आले होते. लोक भयभीत होत घरीच राहणे पसंद केले़ रस्त्यावर समशान शांतता होती. मागील पंधरा वीस दिवसांपासून गल्ली बोळात, कट्ट्यावर चर्चा करणारे, पोलीस येत आहेत का हे डोकावून पाहत गप्पात रंगणारे टोळके  आज गायब झाले आहेत.

कालपर्यंत एकही रुग्ण पॉझिटीव्ह नसल्याने आम्ही सर्वजण गाफील होतो़ वस्तीतील लोकांनाही त्याचे गांभीर्य नव्हते. आज मात्र आम्ही आमची संपूर्ण वस्ती चारही बाजूने रहदारी व बाहेरून येणाºया लोकांसाठी, फेरीवाले, भाजीविक्रेते, दूधवाले यांच्यासाठी बंद केले आहे. दिवसभरात आरोग्य तपासणीसाठी आलेल्या सेविकांशिवाय एकाही व्यक्ती स प्रवेश दिला नाही़ वस्तीतील एकही व्यक्ती बाहेर पडली नाही.- तुळजाराम कडमंची, कुंचिकोरवी झोपडपट्टी, 

मार्कडेय रुग्णालयजवळील फलमारी झोपडपट्टीतील लोकांनी फळ्यांचे टेबल, लोखंडी चक्र असे मिळेल ती वस्तू लावून रहदारी बंद केले. तर भवानी पेठ येथील नागरिकांनी ट्रॉली अन फळ्याचा वापर करीत रस्ता बंद केला. विडी घरकुल येथील गोंधळीवस्तीच्या नागरिकांनी टाकाऊ कुलर व इतर प्लास्टिक च्या वस्तू ठेऊन रस्ता बंद केले होते. कोरोनामुळे घरदार सोडून कर्तव्य बजाविणाºया कविता नगर पोलिस वसाहतीतील  त्यांच्या कटुंबियांनी रस्ता बंद करीत सावधानता बाळगली आहे.    विडी घरकुल परिसरातील गोंधळी वस्ती ते रंगराज नगर कडे जाणारा रस्ता बांबू अन सायकलचे टायर लावून रस्ता बंद करण्यात आला आहे.  सोलापूर - हैद्राबाद  महामार्गावरील गणेश नगर येथील नागरिक लोखंडी कमान, खोके, दगडे मिळेल त्या साहित्याने रस्ता बंद करताना दिसत होत़े़. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य