कुर्डूवाडीत टिपरचालकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:16 IST2021-06-28T04:16:30+5:302021-06-28T04:16:30+5:30

कुर्डूवाडी : पत्नीच्या ओळखीची व्यक्ती व त्याच्या मित्राकडून टिपरचालक पतीस शिवीगाळ करीत काठीने मारहाण केल्याची घटना घडली. शुक्रवारी रात्री ...

Tipper driver beaten in Kurduwadi | कुर्डूवाडीत टिपरचालकास मारहाण

कुर्डूवाडीत टिपरचालकास मारहाण

कुर्डूवाडी : पत्नीच्या ओळखीची व्यक्ती व त्याच्या मित्राकडून टिपरचालक पतीस शिवीगाळ करीत काठीने मारहाण केल्याची घटना घडली. शुक्रवारी रात्री १० वाजता कुर्डूवाडी येथे शेंडे वस्तीत ही घटना घडली. याबाबत उमेश भगवान शिंदे (रा. कुर्डूवाडी) याने पोलिसांत दोघांविरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी कुबेर अभिमान लोंढे व सलीम शेख (दोघेही रा. कुर्डूवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता शिंदे हे टिपरवर कामाला गेले. दिवसभर काम करून रात्री १० वाजता घरी आले आले. कुबेर लोंढे हा पत्नीशी बोलताना दिसून आला. उमेश शिंदे यांनी पत्नीला बोलत असल्याचा जाब विचारताच जवळच थांबलेला मित्र सलीम शेख हाही तिथे आला व दोघांनी मिळून फिर्यादीला मारहाण केली.

Web Title: Tipper driver beaten in Kurduwadi