कुर्डुवाडी : भावाच्या लग्नाची पत्रिका बारलोनी ( ता माढा) येथे पाहुण्यांना वाटून माघारी कण्हेरगाव (ता. माढा) या मूळगावी जाताना कुर्डु हद्दीत समोरून येणाऱ्या पिकअपला समोरासमोर धडक बसून दुचाकीवरील नवरदेवाचा भाऊ अभिजित रमेश मोरे ( वय 22, रा. कण्हेरगाव ) व समवेत असलेले आजोबा महादेव नामदेव डांगे ( वय 70 रा. पिंपळनेर ता. माढा ) हे दोघेजण जागीच ठार झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, कण्हेरगाव (ता. माढा) येथील रमेश मोरे यांचा मुलगा किशोरच्या असणाऱ्या 14 फेब्रुवारी दिवशीच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन त्याचा भाऊ अभिजित मोरे व मुलाचे आईकडील आजोबा महादेव डांगे हे तालुक्यातील बारलोनी गावी पाहुण्यांच्या पत्रिका घेऊन गेले होते. त्यावेळी माघारी परतत असताना कुर्डुवाडी ते कुर्डु रस्त्याच्या दरम्यान कुर्डुच्या हद्दीत समोरून येणाऱ्या चारचाकी पीकअप (एम एच 24-ए बी 6325) या भरधाव येणाऱ्या गाडीने मोरे यांच्या दुचाकी (एम एच 45 डब्लू 9943 ) या गाडीला जोराची धडक दिली. त्यात ते दोघेही जागीच ठार झाले आहेत. अपघातानंतर पिकअप चालक पळून गेला आहे.
लग्नपत्रिका वाटप करून परतत असताना दोघांवर काळाची झडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 16:26 IST
माढा तालुक्यातील घटना; दुचाकी व पिकअपचा झाला अपघात
लग्नपत्रिका वाटप करून परतत असताना दोघांवर काळाची झडप
ठळक मुद्देदुचाकी व पिकअपचा झाला अपघातअपघातात दोघांचा जागीच मृत्यूअपघातानंतर पिकअप चालक पळून गेला