प्रवेशद्वाराची कमान कोसळून तीन कामगार ठार; बार्शी तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 15:40 IST2020-04-12T15:40:14+5:302020-04-12T15:40:46+5:30

बार्शी-तुळजापूर मार्गावरील बावी फाटा येथे गेल्या काही दिवसांपासून गावाच्या कमानीच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू होते

Three workers dead in collapse entrance gate of village; incident in Barshi taluka | प्रवेशद्वाराची कमान कोसळून तीन कामगार ठार; बार्शी तालुक्यातील घटना

प्रवेशद्वाराची कमान कोसळून तीन कामगार ठार; बार्शी तालुक्यातील घटना

कुसळंब : बार्शी तालुक्यातील बावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने प्रवेशद्वाराच्या कमानीचे बांधकाम सुरू होते. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कमान कोसळून तीन मजूर जागीच ठार झाले.

बार्शी-तुळजापूर मार्गावरील बावी फाटा येथे गेल्या काही दिवसांपासून गावाच्या कमानीच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू होते. याठिकाणी नऊ कामगार काम करीत होते, मात्र दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक कमान अंगावर कोसळून 3 मजूर जागीच ठार झाले.
महेश भारत डोळसे (वय 27, राहणार वैराग), विकास सुग्रीव वाळके (वय 35 रा. मानेगाव) आणि दीपक संभाजी घोलप (वय 32, रा. दडशिंगे) अशी त्यांची नावे आहेत.

Web Title: Three workers dead in collapse entrance gate of village; incident in Barshi taluka

टॅग्स :Accidentअपघात