शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीत दरड कोसळून तीन महिला जखमी

By admin | Updated: August 6, 2015 23:12 IST

जखमी सोलापूरचे : पर्यटकांच्या गाडीचेही नुकसान

आंबोली : आंबोलीच्या मुख्य धबधब्यापाशी गुरुवारी पुन्हा दरड कोसळली. यातील दोन दगड स्टॉलच्या ठिकाणी कोसळले. यापैकी मोठा दगड सोलापूरहून ट्रॅक्सने आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या गाडीवर आदळला. यामध्ये गाडीचा दरवाजा तुटून तीन महिला जखमी झाल्या. ही घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. सोलापूरहून नऊ पर्यटक ट्रॅक्स करून आंबोली धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी आले होते. पहाटे निघालेल्या पर्यटकांनी आंबोलीत दुपारी प्रवेश केला. त्यांनी गाडी धबधब्याच्या नजीक थांबविली. ते गाडीतून उतरण्याच्या तयारीत असतानाच अचानक दरडीतून आलेला मोठा दगड त्यांच्या गाडीवर आदळला. यावेळी गाडीतील तिघींना दुखापत झाली. ही घटना मुख्य धबधब्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्टॉलजवळच घडल्याने येथे क्षणार्धात मोठी गर्दी झाली. दगड बाजूला करून गाडी तत्काळ पुढे नेण्यात आली. जखमींवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी गडहिंग्लजकडे नेण्यात आले. दरम्यान, गेल्या महिन्याभरात गाडीवर दगड पडण्याची ही तिसरी वेळ असून, दोन घटनांमध्ये वाहनांचेच नुकसान झाले होते. यावेळी वाहनामधील प्रवाशांनाही दुखापत झाली आहे. (वार्ताहर)