शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील तीन शिक्षकांची आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 14:53 IST

सोलापूर : सृजनशीलता आणि नवोपक्रम विषयावरील चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम सादरीकरणासाठी सोलापूर जिल्ह्यातील झेडपी शाळांमधील सुधीर नाचणे,योगेशकुमार भांगे ...

ठळक मुद्देनावीन्यपूर्ण उपक्रम: गणित पेटी, ताटवाटीद्वारे कर्णबधिरांचा शोधसुधीर नाचणे,योगेशकुमार भांगे व रवी चव्हाण या तीन शिक्षकांची निवड गुजरातमधील अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्थेतर्फे ही परिषद

सोलापूर : सृजनशीलता आणि नवोपक्रम विषयावरील चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम सादरीकरणासाठी सोलापूर जिल्ह्यातील झेडपी शाळांमधील सुधीर नाचणे,योगेशकुमार भांगे व रवी चव्हाण या तीन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.  गुजरातमधील अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्थेतर्फे ही परिषद होत आहे.

या परिषदेसाठी महाराष्ट्रातील सहा शिक्षकांची निवड करण्यात आली असून, त्यात सोलापूर जिल्ह्यातील तीन शिक्षक आहेत. ग्रामीण भागात काम करणाºया या शिक्षकांनी  कल्पकतेने आपल्या शाळांमध्ये आमूलाग्र बदल केला आहे. झेडपीचे  प्राथमिक शिक्षण अधिकारी संजयकुमार राठोड, जिल्हा व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्या ज्योती मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिक्षकांनी अभिनव उपक्रम तयार केले आहेत. त्यांना सर फाउंडेशनचे सिद्धाराम माशाळे,  बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे यांनी मदत केली आहे. 

या यशाबद्दल झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र्र भारुड, शिक्षण संचालक डॉ. सुनील मगर,उपसंचालक विकास गरड,संशोधन विभागाचे डॉ.गीतांजली बोरुडे यांनी कौतुक केले आहे. २८ जानेवारी रोजी या परिषदेचे उद्घाटन झाले. ३0 जानेवारीपर्यंत देशभरातील शिक्षक आपले संशोधनाचे या परिषदेत सादरीकरण करणार आहेत. 

या उपक्रमाची दखलच्झेडपीच्या यशवंतनगर (ता.माळशिरस) शाळेतील सुधीर नाचणे यांनी विद्यार्थ्यांची गणिताची भीती दूर व्हावी व मनोरंजक पद्धतीने गणित अध्यापन व्हावे यासाठी कृतियुक्त गणित पेटीची निर्मिती केली आहे. तर वडाचीवाडी (ता. माढा) येथील योगेशकुमार भांगे यांनी कर्णबधीर बालकांचा शोध घेण्यासाठी संशोधन करून ताटवाटीची चाचणी तयार केली आहे.

इंगोलेवस्ती (खंडाळी, ता. मोहोळ) येथील शाळेतील शिक्षक रवी चव्हाण यांनी लोकवर्गणीतून सोलार ऊर्जेसह शाळेचा भौतिकदृष्ट्या कायापालट केला. प्रा. विजय शेरीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली एज्युकेशन इनोव्हेशन बँक हा प्रोजेक्ट देशात सुरु आहे. या प्रकल्पांतर्गत या शिक्षकांना ३० जानेवारी रोजी अहमदाबाद येथील रवि जे मथाई सेंटर येथे सन्मानित करण्यात येणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरTeacherशिक्षकEducationशिक्षणInternationalआंतरराष्ट्रीय