अपंग चैतन्यसह तिघांनी फडकविला साडेबारा हजार फुटांवर तिरंगा ध्वज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 16:06 IST2019-02-21T16:02:24+5:302019-02-21T16:06:15+5:30
सोलापूर : एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी स्थापन केलेल्या ३६० एक्स्प्लोरर ग्रुपने हिमालयात मनालीजवळ ‘नेगीडुग’ या ठिकाणी १२,५०० फूट चढाई ...

अपंग चैतन्यसह तिघांनी फडकविला साडेबारा हजार फुटांवर तिरंगा ध्वज
सोलापूर : एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी स्थापन केलेल्या ३६० एक्स्प्लोरर ग्रुपने हिमालयात मनालीजवळ ‘नेगीडुग’ या ठिकाणी १२,५०० फूट चढाई करून भारताचा तिरंगा फडकविला आहे. १० फेब्रुवारी रोजी ही मोहीम सुरु होऊन १४ फेब्रुवारी रोजी यशस्वी झाली. चार वर्षांपूर्वी झाडावर पडून अपंगत्व आलेला चैतन्य कुलकर्णी यानेही ही उंची गाठून एक विक्रम प्रस्थापित केला आहे.
गेले वर्षभर एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक व मानसिक तयारी तो करत होता. मुंबईमध्ये सध्या काम करत असलेले गणेश नारकर व रमेश कलेल यांनीही ही उंची गाठण्यात यश मिळवले आहे. याच काळात मनाली परिसरात हाय-अलर्ट होता व सतत बर्फ पडून सर्व वाट निसरडी झाली होती.
धोकादायक रस्ता, धुके, पडणारा बर्फ अशा अनेक अडचणींना तोंड देत सर्वांनी ‘नेगीडुग’ हा ट्रेक पूर्ण केला. या मोहिमेत गणेश नारकर व रमेश कलेल हेही सहभागी झाले होते.
अपंगत्वावर मात
- - कमरेखालील भाग पॅरालाईज झालेला असतानाही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर चैतन्य कुलकर्णी याने हिमालयात सलग चार दिवस ट्रेकिंग करून १२,५०० फूट उंच जाऊन भारतीय ध्वज फडकविला. भीतीवर मात आणि आनंद बनसोडे यांचे प्रशिक्षण यामुळे हे यश मिळाल्याचे चैतन्य कुलकर्णी यांनी सांगितले.
हिमालयाच्या १२,५०० फुटांवर पोहोचून सर्व जण भाऊक झाले होते. तिरंगा फडकवताना सर्वांना अभिमान वाटला. येणाºया काळात अशा अनेक मोहिमांद्वारे गिर्यारोहण व निसर्ग भटकंतीचा प्रसार व प्रचार करण्याचे काम करणार आहे.
- आनंद बनसोडे, एव्हरेस्टवीर