नागसूरजवळ वाहन पलटी झाल्याने तिघे प्रवासी जखमी
By दिपक दुपारगुडे | Updated: December 9, 2023 19:18 IST2023-12-09T19:18:13+5:302023-12-09T19:18:22+5:30
सोलापूर : हैद्रा गावाहून सोलापूरकडे येणारे वाहन नागणसूर गावाजवळ पलटी झाल्याने यातील तीन प्रवासी जखमी झाले. तीनच्या सुमारास ही ...

नागसूरजवळ वाहन पलटी झाल्याने तिघे प्रवासी जखमी
सोलापूर : हैद्रा गावाहून सोलापूरकडे येणारे वाहन नागणसूर गावाजवळ पलटी झाल्याने यातील तीन प्रवासी जखमी झाले. तीनच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
उमेश शमशोद्दीन बांगी (वय- २४, रा. संतोष नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर), फैय्याज इक्बाल शेख (वय- २१, कल्पनानगर, अक्कलकोट रोड, सोलापूर), साहिल रमजान शेख (वय- २८, रा. कोंडा नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत.
यातील जखमी तिघे कामानिमित्त हैद्रा गावी गेले होते. वरील वाहनातून तिघे सोलापूरकडे येत असताना नागणसूरजवळ सदर वाहन पलटी झाल्याने त्यांच्या सर्वांगास मुका मार लागला.
अपघाताचे वृत्त कळताच लोक धावले. जखमींना त्यांचा मित्र आयान याने तातडीने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून, ते शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.