तुळजापूर घाटात रिक्षा-ट्रकचा भीषण अपघात, सोलापुरातील तिघांचा जागीच मृत्यू, 7 जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 12:05 IST2017-11-09T11:29:02+5:302017-11-09T12:05:58+5:30
तुळजापूरहुन सोलापूरकडे येणा-या रिक्षाला ट्रकची जोरदार धडक बसली. या धडकेत सोलापुरातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाले आहेत.

तुळजापूर घाटात रिक्षा-ट्रकचा भीषण अपघात, सोलापुरातील तिघांचा जागीच मृत्यू, 7 जण जखमी
सोलापूर - तुळजापूरहुन सोलापूरच्या दिशेनं येणा-या रिक्षाला ट्रकची जोरदार धडक बसली. या अपघातात सोलापुरातील तीन जणांचा मृत्यू झाला असून अन्य सात जण जखमी झाले आहेत. तुळजापूरच्या घाटातील ही घटना आहे. व्यंकटेश आरटेल, योगेश महिंद्रकर, दीपक पुठ्ठा अशी मृतांची नावं आहेत. तर कमलाबाई व्यंकप्पा पोेबत्ती (वय ५५), व्यंकप्पा नारायण पोबत्ती (वय ४५), लक्ष्मी नागेश पोबत्ती (वय ४५), बालाजी नागेश पोबत्ती (वय १८), अंबिका नागेश पोबत्ती (वय १६), बाळु व्यंकप्पा पोबत्ती (वय ४०) हे सर्व जण जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्त सर्व जण विडी घरकुल सोलापूर येथील रहिवाशी आहेत. हे सर्वजण गुरूवार (9 नोव्हेंबर) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या देवदर्शनासाठी गेले होते. सोलापूरकडे परतत असताना तुळजापूर घाटात त्यांच्या रिक्षाला समोरून भरधाव येणा-या ट्रकने जोराची धडक दिल्यानं दुर्घटना घडली. दरम्यान, जखमींवर उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात तसेच सोलापुरातील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.